facebook
Sunday , May 28 2017
Breaking News
Home / Featured / आरोग्य, पाणीपुरवठ्याच्या सर्वाधिक तक्रारी

आरोग्य, पाणीपुरवठ्याच्या सर्वाधिक तक्रारी

आवाज न्यूज नेटवर्क –

कोल्हापूर – प्रभागातील कचरा उठाव होत नाही, ड्रेनेज लाइन चोकअप झालीय, पाइपलाइनच्या गळतीकडे दुर्लक्ष होतेय, परिसरात विनापरवाना बांधकाम होत आहे, रस्त्यावरील विद्युत दिवे खराब आहेत… अशा एक ना समस्या नागरिकांसमोर असतात. मग, त्यासाठी महापालिकेत हेलपाटे घालायचे किंवा नगरसेवकाला सांगायचे ही पारंपरिक पद्धत. मात्र, महापालिकेने सुरू करून दिलेल्या १८००२३३१९१३ या टोल फ्री क्रमांकाने नागरिकांना एक स्वतंत्र व्यासपीठ दिले. गेल्या सहा महिन्यात या हेल्पलाइनकडे नोंदविण्यात आलेल्या तब्बल ११४२ तक्रारींत आरोग्य विभागाशी निगडीत तक्रारींची संख्या सर्वाधिक आहे. आरोग्य विभागाशी संबंधीत ५३२, विद्युत विभागाशी संबंधित २६३ तर अपुरा पाणीपुरवठा, पाइपलाइन गळती याबाबत ९४ तक्रारींची नोंद झाली आहे.

जून ते नोव्हेंबर या काळात नागरिकांच्या ११४२ तक्रारींपैकी १०९६ तक्रारींची सोडवणूक केल्याचा दावा प्रशासनाचा दावा आहे. तक्रारी दाखल झाल्यानंतर त्याच्या सोडवणुकीबाबतची माहिती एसएमएस करून नागरिकांना दिली जाते. त्यातून आपल्या प्रश्नाचे काय झाले याची माहिती नागरिकांना घरबसल्या होऊ लागली आहे. तर हेल्पलाइन सुविधेमुळे शहराच्या कोणत्या भागात नेमकी कोणती समस्या आहेत, याची माहितीही जमा होत आहे.

प्रभागातील कचरा उठाव, साफसफाई, पाइपलाइन गळती, अतिक्रमणे, अनधिकृत बांधकाम, ड्रेनेज चोकअप अशा विविध तक्रारी नागरिकांना घरबसल्या करता येतात. महापालिकेच्या कामकाजात नागरिकांना सामावून घेण्यासाठी ही सुविधा सुरू करण्यात आली. याबाबत जनसंपर्क विभागात तक्रार निवारण कक्ष सुरू करण्यात आला आहे. येथे तक्रारींची नोंद होते. त्यानंतर संबंधित विभागांना तक्रारींचे स्वरुप आणि नागरिकांना तक्रार नोंदवून घेतल्याविषयीची माहिती कळवली जाते.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *