facebook
Sunday , May 28 2017
Breaking News
Home / Featured / उपराजधानी होतेय कॅशलेस

उपराजधानी होतेय कॅशलेस

आवाज न्यूज नेटवर्क –

नागपूर – देशातील सर्व आर्थिक व्यवहार पारदर्शक व्हावे, यासाठी ‘कॅशलेस भारत’ या दिशेने पाऊल उचलण्यात आले आहे. वेगवेगळी राज्येही आपआपल्या पातळीवर यासाठी पुढाकार घेत आहेत. अद्यापही अनेकांचे बँक खाते नसणे, ही यातील मोठी अडचण असून, नागपूर जिल्हा प्रशासनाने सर्वांचे बँक खाते उघडण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

सुरुवातीला २८ आणि २९ नोव्हेंबर रोजी विविध ठिकाणी शिबिर भरविण्यात आले. या दोन दिवसांत २ हजार १०३ नवीन बँक खाती उघडण्यात आली आहे. मात्र, अद्यापही अनेकांकडे बँक खातेच नसल्याने कॅशलेस आर्थिक व्यवहारांचा उद्देश पूर्ण होऊ शकत नाही. बँक खाते नसणाऱ्या नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नव्याने शिबिर भरविले आहे. १ डिसेंबरपासून १० ठिकाणी शिबिर भरवून नागरिकांना बँक खाते उघडण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बँक खाते उघडण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या नेतृत्वात सहायक कामगार आयुक्त एम. पी. मडावी, व्ही. आर. लोखंडे आदींची चमू या शिबिराचे नियोजन करीत आहे.

येथे होतील शिबिर

जिल्हयातील सर्व संघटित व असंघटित कामगारांचे खाते असावे, यासाठी आग्रह धरण्यात येत आहे. १ डिसेंबरपासून कळमना येथील कृषी उत्पन्न बाजार समिती, महाल येथील टाऊन हॉल, रिंग रोडवरील राणी दुर्गावती नगर चौक, विटा भट्टी चौक, हिंगण्यातील एमआयडीसी कार्यालय, कळमेश्वर एमआयडीसी कार्यालय, बुटीबोरी एमआयडीसी कार्यालय, वाडी नगरपरिषद कार्यालय, जरीपटका पोलिस स्टेशन जवळ, शिवणगाव फाटा या ठिकाणी शिबिर भरविण्यात येत आहे. बँक ऑफ इंडियाचे गुलाब कुंभारे नोडल अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. (संपर्कः ९४२२९०५९१०)

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *