facebook
Tuesday , April 25 2017
Breaking News
Home / Featured / ‘एचआयव्ही’ग्रस्तांना लाभणार दीर्घायुष्य

‘एचआयव्ही’ग्रस्तांना लाभणार दीर्घायुष्य

आवाज न्यूज नेटवर्क –

पुणे – ‘एचआयव्ही’ग्रस्त पेशंटच्या शरिरातील पांढऱ्या पेशींचे प्रमाण (सीडी फोर काउंट) पाचशेच्या खाली येताच त्यांना तातडीने विषाणू प्रतिबंधात्मक उपचार (एआरटी) सुरू करण्याचा निर्णय राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेने (नॅको) घेतला आहे. त्यामुळे आता ‘एचआयव्ही’ग्रस्तांना दीर्घायुष्य लाभण्याची शक्यता आहे.
या निर्णयाची ‘नॅको’कडून अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात नव्याने सहा हजार जणांना नव्याने ‘एआरटी’चे उपचार मिळण्यास सुरुवात झाली आहे. ‘एचआयव्हीग्रस्तांना एआरटी कधी सुरू करावी, या विषयी विविध मतप्रवाह आहेत. आजच्य घडीपर्यंत ३५० पर्यंत सीडी फोर काउंट असणाऱ्या पेशंटांना एआरटी देण्यात येत होती. आता एचआयव्हीची औषधे सुरू करण्यात यावी, अशी शिफारस जागतिक आरोग्य संघटनेने नॅकोला केली होती. परंतु, नॅकोने ती शिफारस अद्याप मान्य केलेली नाही. त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने पुन्हा या शिफारशींमध्ये बदल केला. पाचशेपेक्षा कमी सीडी फोर काउंट असणाऱ्या एचआयव्हीग्रस्तांना तत्काळ एआरटी सुरू करण्याची शिफारस संघटनेने ‘नॅको’ला केली होती. शिफारशींची अंमलबजावणी करण्याचे आदेश नॅकोने सर्व राज्य एड्स नियंत्रण संस्थांना दिले आहेत,’ अशी माहिती राज्याच्या आरोग्य खात्यातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.
पाचशेपेक्षा सीडी फोर काउंट असताना ‘एआरटी’ सुरू केल्याने विषाणूंचा प्रादुर्भाव आणि संसर्ग कमी करणे शक्य आहे. सहा हजार पेशंटना नव्याने ‘एआरटी’ सुरू करण्यात आली. त्यांची दर सहा महिन्याला तपासणी करण्यात येत होती. दाम्पत्यामध्ये पत्नीला संसर्ग झाल्यास तिच्यामार्फत पतीला संसर्ग होण्याचा धोका कमी होऊ शकतो. त्याशिवाय गर्भवती महिलेला तातडीने ‘एआरटी’ सुरू केल्यास तिच्यापासून बाळाला संसर्ग होण्याचा धोकाही कमी होणार आहे. गर्भवतीसाठी सीडी फोर कांटची मर्यादा शिथिल करण्यात आली आहे. पूर्वी मातेपासून बाळाला होणाऱ्या संसर्गाचे प्रमाण १५ टक्के होते; ते आता पाच टक्क्यांवर आले आहे, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.

राज्यातील सद्यस्थिती
७२
एआरटी केंद्राची संख्या
१७७
लिंक सेंटर
१ लाख ७७ हजार ४५२
एआरटीचे उपचार
५, ०००
पेशंटना सेकंड लाइन एआरटी
९५ टक्के
बाधित पेशंटना एआरटीचे उपचार

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *