facebook
Wednesday , April 26 2017
Breaking News
Home / Featured / एसटीला रोज साडेचार लाखांचा तोटा

एसटीला रोज साडेचार लाखांचा तोटा

आवाज न्यूज नेटवर्क –

औरंगाबाद – टापरगावचा पूल दुरुस्त करण्यासाठी तेथून जड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्याचा एसटीला सर्वाधिक फटका बसत आहे. एसटी महामंडळाचे दररोज सुमारे साडेचार लाख रुपयांचे उत्पन्न कमी झाल्याची माहिती एसटी सूत्रांनी दिली.
धुळे, चाळीसगाव, कन्नड येथे या पुलावरून बस जातात. याशिवाय औरंगाबाद-बऱ्हाणपूर आणि अन्य मार्गावरील बसही तेथून जातात. औरंगाबाद-कन्नड मार्गावरून रोज सुमारे ३०० प्रवासी जातात. याशिवाय औरंगाबादहून चाळीसगावला जाऊन आणि तेथून पुढे रेल्वेने उत्तरेकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्याही जास्त आहे. या मार्गावर रोज ३५० बस धावतात. सुमारे आठ हजार प्रवासी या मार्गावरून रोज प्रवास करतात.
औरंगाबाद विभागाला चाळीसगाव आणि जळगाव या मार्गावर जास्त प्रवासी मिळतात. टापरगावचा पूल बंद केल्याने औरंगाबाद टापरगाव आणि टापरगाव ते कन्नड अशी बस चालविण्यात येत आहे. थेट कन्नडपर्यंत जाणाऱ्या प्रवाशांना टापरगाव पुलाच्या अलीकडे उतरावे लागते. पायी पूल ओलांडून दुसऱ्या बाजूला असलेल्या एसटीतून कन्नडकडे जावे लागते. याशिवाय धुळ्याला जाण्यासाठी नांदगावहून फेरा होत असल्याने, प्रवाशांना ३४ रुपये अतिरिक्त मोजावे लागत आहेत. टापरगावच्या पूल वाहतुकीसाठी बंद असल्यामुळे, एसटीला साडेचार लाख रुपयाचा दररोज तोटा होत असल्याची माहिती एसटीच्या सूत्रांनी दिली.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *