facebook
Tuesday , January 24 2017
Breaking News
Home / Featured / चांगली देखभाल करणाऱ्यांना मैदाने

चांगली देखभाल करणाऱ्यांना मैदाने

आवाज न्यूज नेटवर्क –

मुंबई – मैदाने तसेच उद्यानांच्या देखभालीसाठी विविध संस्थांना देण्यात आलेले २१६ भूखंड महापालिका ताब्यात घेणार आहे. भुखंडाबाबत पालिकेने नवीन धोरण तयार केले असून ज्या संस्था व कंत्राटदारांनी या मैदाने व उद्यानांची उत्तम देखभाल केली आहे, त्यांच्या ताब्यात मैदाने-उद्याने देण्याची संधी पालिका देणार आहे.

मैदाने आणि उद्याने दत्तक तत्वावर देण्याबाबतच्या नवीन धोरणानुसार पालिकेने २१६ मोकळे भूखंड ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ३६ भूखंड ताब्यात घेतले आहेत. उर्वरित संस्था व कंत्राटदारांना नोटीस पाठवल्या आहेत. चांगले काम असलेल्या संस्थांना देखभाल तत्वावर भूखंड परत दिले जातील. क्रीडांगणे म्हणून विकसित केलेले मोकळे भूखंड ठराविक कालावधीसाठी विद्यार्थी, जनतेला निशुल्क वापरता येणार आहेत, असे पालिका आयुक्त अजय मेहता यांनी स्थायी समितीच्या बैठकीत स्पष्ट केले.

Check Also

विकास कामे झाली, पण ठराविक लॉबीचीच झाली – यशवंत भोसले

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *