facebook
Wednesday , March 29 2017
Breaking News
Home / Featured / पगार होऊनही चणचण कायम

पगार होऊनही चणचण कायम

आवाज न्यूज नेटवर्क –

नाशिक – रोज बदलणारे नियम, कॅश शॉर्टेज यामुळे अगोदरच संतापलेल्या वेतनदारांना आता नव्या पगाराची रक्कम आपल्या हातात मिळेल की नाही या शंकेने ग्रासले आहे. दुसरीकडे, बँकाही छोट्या चलनाच्या नोटांची उपलब्धता कमी असल्याचे कारण देत हतबल झाल्या आहे.

रिझर्व्ह बँकेकडून पुरेशा कॅशचा पुरवठाच होत नसल्यामुळे केवळ छोट्या चलनी नोटांवरच बँकांचे व्यवहार सुरू आहेत. त्यात पाचशेच्या नोटांचाही तुटवडा असून शंभराच्या नोटाही कमी झाल्या आहे. त्यामुळे बँकेसमोर पगारदारांचे आव्हान असणार असून पहिले दहा दिवस पैसे काढण्याचे प्रमाण जास्त असणार असल्याने बँकांसमोर दैनंदिन व्यवहार सुरळीतपणे चालवायचे कसे असा प्रश्न बँक कर्मचाऱ्यांना पडला आहे.

आठवड्यातून २४ हजार रुपये काढण्याचा मर्यादा बँकेने ठेवली असली तरी ही रक्कम सुध्दा बँक देईल का? दिली तर त्या नोटा दोन हजारांच्या तर असणार नाहीत ना? असे एक ना अनेक प्रश्न वेतनदारांना पडले आहे. तसेच रोज बदलणाऱ्या नियमांमुळेही संभ्रम वाढला आहे. कामगारांना आपल्याच हक्काच्या पैशासाठी आता बँकांवर विसंबून रहावे लागणार आहे. रिझर्व्ह बँकेने कमीत कमी कॅशचा वापर व्हावा, यासाठी सुरुवातीपासून कॅशचा पुरवठा हातचे राखून आहे. बँका मागणी करून रिझर्व्ह बँकेकडून पैसे दिले जात नसल्याच्याही बँकांचे म्हणणे आहे.

बहुतांश बँकांमध्ये नोकरदारांचे वेतन ३० नोव्हेंबरला जमा झाले. तर १ डिसेंबर रोजी उर्वरित कामगारांचे वेतन जमा होणार आहे. कॉर्पोरेट व खासगी संस्थांमधील कर्मचाऱ्यांना बँकांमधून थेट वेतन दिले जात आहे. असंघटीत कामगारांनाही बँकांमधून वेतन देण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे बँकांमध्ये गर्दी वाढणार आहे.

पेन्शनर्ससमोरही अडचणी
नोटा रद्द झाल्याने पेन्शनर्सच्याही अडचणीत वाढ झाली आहे. अनेक संस्थांमधील पेन्शनर्सचेही पेन्शन बँकेतून दिले जाते. त्यामुळे त्यांच्या या तुटपुंज्या पेन्शनची पूर्ण रक्कम मिळावी यासाठी त्यांची चिंता वाढली आहे.

एटीएमची सेवा बेभरवशाची
पाचशे हजारांच्या नोटा बाद झाल्यानंतर जिल्हाभरातील ९०३ एटीएम मशिन पूर्ण क्षमतेने अद्याप सुरू झालेले नाहीत. कॅश नसल्यामुळे अनेक बँकांनी आपले एटीएम सुरूच केलेले नाहीत. त्यात राष्ट्रीयीकृत बँकांचे एटीएम सुरू असले तरी तेथेही मोठ्या प्रमाणात गर्दी होत आाहे. त्यामुळे कॅश काही तासातच संपत असल्याने एटीएमचा हा चालू बंदचा खेळही डोकेदुखी ठरला आहे. एटीएमचा पगारदारांना आधार असला तरी त्यांची चिंता कमी झालेली नाही.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *