facebook
Friday , March 24 2017
Breaking News
Home / Featured / मुख्याधिकारी नियुक्त करा

मुख्याधिकारी नियुक्त करा

आवाज न्यूज नेटवर्क –

अहमदनगर – येथील नगरपंचायत निवडणूक होऊन व पदाधिकारी निवडून दीड वर्षानंतरही कायमस्वरूपी मुख्यधिकारी व केडर्स तसेच आकृतीबंधाप्रमाणे सर्व कर्मचाऱ्यांची तातडीने नियुक्ती झालेली नाही. या नियुक्त्या न झाल्यास नगरपंचायतीला टाळे ठोकून बेमुदत उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागेल, असा इशारा नगराध्यक्ष के. डी. धुमाळ यांनी दिला. आपल्या सर्व सदस्यांसह अकोले तहसीलदार कचेरीसमोर त्यांनी या मागणीसाठी लाक्षणिक उपोषण केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गिरजाजी जाधव, शांताराम वाळूंज, माधव तिटमे, उपनगराध्यक्ष प्रकाश नाईकवाडी, कैलास वाकचौरे, अकोले एज्युकेशन संस्थेचे सचिव यशवंत आभाळे, नगरसेवक व नगरसेविका आदी या वेळी उपस्थित होते. तहसीलदार मनोज देशमुख यांनी निवेदन स्वीकारले व निवेदन तातडीने सरकारकडे पाठविले जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले.

अकोले नगरपंचायतीला दीड वर्षापासून मुख्यधिकारी मिळण्याची प्रतीक्षा असून तात्पुरत्या स्वरूपाची नियुक्ती देण्यात येऊन मुख्यधिकारी उपस्थित न राहिल्याने कामकाज करताना अडथळे येत आहेत. विकासकामे होत नसल्याने नगराध्यक्ष, उपनगरध्यक्ष व सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे या प्रस्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी उपोषण करण्यात आले. नगरपंचायतीला कायमस्वरूपी मुख्यधिकारी, बांधकाम अभियंता, पाणी पुरवठा अभियंता, स्वच्छता अभियंता, कर अधीक्षक, कार्यालयीन अधीक्षक द्यावेत याबाबत सरकारला वेळोवेळी निवेदन देऊनही सरकार दुर्लक्ष करीत असल्याने सरकारचा निषेध म्हणून एक दिवसाचे उपोषण करीत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *