facebook
Tuesday , January 24 2017
Breaking News
Home / Featured / संपूर्ण गाव बंद ठेवून कुणाल गोसावी यांना श्रद्धांजली

संपूर्ण गाव बंद ठेवून कुणाल गोसावी यांना श्रद्धांजली

आवाज न्यूज नेटवर्क –

पंढरपूर – प्रतिनिधी (नागनाथ सुतार ) – जम्मू काश्मीरच्या नगरोटामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील पंढरपूरचे रहिवासी असलेले मेजर कुणाल मुन्नागिर गोसावी शहीद झालेत. कुणाल गोसावी यांना वीरमरण आल्यानंतर त्यांच्या मुळगावी वाखरीमध्ये शोककळा पसरलीय. आज सकाळी ग्रामस्थांनी संपूर्ण गाव बंद ठेवून कुणाल यांना श्रद्धांजली अर्पण केली. पंढरपूरपासून जवळच वाखरी पुणे रोडवर कुणाल यांची शेती आहे. या शेतात कुणाल यांच्यावर अंत्यंस्कार करण्यात येणार आहेत. प्रशासनाच्या वतीने रात्रीच जागेची सापसफाई करण्यात आलीय. कुणालच्या वडीलांना भेटण्यासाठी पहाटे पासूनच शहरातल्या नागरिकांची रिघ लागली आहे. संपूर्ण शहर शोकसागरात बुडालं आहे. ठिकठिकाणी कुणालच्या श्रध्दांजली बोर्ड लावून अनेकांनी श्रध्दांजली वाहिली आहे.news-25 news-27 news-28

Check Also

विकास कामे झाली, पण ठराविक लॉबीचीच झाली – यशवंत भोसले

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *