facebook
Sunday , May 28 2017
Breaking News
Home / Featured / सातारा रस्त्यावरील वाहनांना उड्डाणपूलबंदी

सातारा रस्त्यावरील वाहनांना उड्डाणपूलबंदी

आवाज न्यूज नेटवर्क –

पुणे – शंकरशेट रस्त्यावरील वाहनांना सारसबागेकडे जाण्यासाठी उड्डाणपूल खुला करण्यात आल्याने पुढील काही काळ सातारा रस्त्यावरून स्वारगेटच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना उड्डाणपुलाखालूनच जावे लागणार आहे. स्वारगेट येथील केशवराव जेधे चौकातील उड्डाणपुलावरून केवळ शंकरशेट रस्त्याने येणारी वाहने जाऊ शकणार आहेत.
स्वारगेट येथील केशवराव जेधे चौकातील ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे शंकरशेट रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. ही कोंडी सोडविण्यासाठी सातारा रस्त्याकडून शंकरशेट रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी असणारा उड्डाणपूल शंकरशेट रस्त्याने येऊन नेहरू स्टेडिअमकडे जाणाऱ्या वाहनांसाठी खुला करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीस नुकतीच सुरुवात झाली. ग्रेड सेपरेटरचे काम पूर्ण होईपर्यंतच हा निर्णय लागू असणार आहे.
गेल्या काही महिन्यांपासून जेधे चौकात ग्रेड सेपरेटरचे काम सुरू आहे. सुरुवातीच्या टप्प्यात गणेश कला क्रीडा मंचासमोरील बाजूचे काम करण्यात आले. त्यावेळी नटराज हॉटेलच्या बाजूची लेन वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आली होती. अद्याप ती लेन बंद आहे. तसेच, आता शंकरशेट रस्त्यावर एसटी स्टँडच्या समोर ग्रेडसेपरेटरसाठी खोदकाम करण्यात येत आहे. त्यामुळे येथे वाहतुकीसाठी सिंगल लेनपेक्षा कमी रस्ता उपलब्ध आहे. परिणामी, गर्दीच्या वेळी वाहनांच्या मोठ्या प्रमाणावर रांगा लागतात. या रांगा कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी शंकरशेट रस्त्याने येणाऱ्या वाहनांना पुढे जाण्यासाठी उड्डाणपुलाचा वापर करण्याची सूचना केली आहे. त्यासाठी सातारा रस्त्याने शंकरशेट रस्ता व सारसबागेकडे जाणाऱ्या वाहनांना उड्डाणपूल तात्पुरता बंद करण्यात आला आहे.
दरम्यान, शंकरशेट रस्त्याने येणाऱ्या एसटी बसला स्वारगेट स्टँडला जाण्यासाठी ढोले पाटील (सेव्हन लव्हज) चौकातून डावीकडे वळून डायस प्लॉट, मुकुंदनगर येथून लक्ष्मीनारायण टॉकिज चौकातून एसटी स्टँडकडे जावे लागणार आहे.

सातत्याने वाहतूक कोंडीचा त्रास
ग्रेडसेपरेटरचे काम आता मुख्य चौकापर्यंत आले आहे. त्यामुळे चौकातील वाहतूक धिम्यागतीने पुढे सरकत आहे. परिणामी, बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास स्वारगेट परिसर आणि टिळक रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. सुमारे अर्धा ते पाऊण तास ही कोंडी ‘जैसे थे’ होती

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *