facebook
Saturday , December 3 2016
Home / Featured / गिरणा, सुकी पर्यटनस्थळांचे प्रस्ताव पडून
aawaz-news-image

गिरणा, सुकी पर्यटनस्थळांचे प्रस्ताव पडून

आवाज न्यूज नेटवर्क –

जळगाव – उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे असलेले गिरणा धरण आणि सातपुड्यातील सुकी धरण या स्थळांना पर्यटकांचा ओघ असल्याने ही दोन्ही ठिकाणे पर्यटनस्थळे म्हणून विकसित करण्याबाबत तापी पाटबंधारे विकास महामंडळाकडून गेलेला प्रस्ताव मंत्रालयात पडून आहे. विशेष म्हणजे गिरीश महाजन यांनी जलसंपदाचा कार्यभर स्वीकारल्यानंतर त्यांनी या दोन्ही धरणांना पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यात येईल, असे जाहीर केले होते.

नांदगाव तालुक्यात असलेले गिरणा नदीवरील गिरणा धरण हे उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण असून, जायकवाडी प्रमाणे हे विकसित करण्यात यावे अशी जुनी मागणी आहे. धरणावरील रेस्ट हाऊसची दयनीय अवस्था आहे. या धरणास पर्यटन स्थळ जाहीर केल्यास किमान सुविधा पर्यटकांना मिळू शकतील अशी अपेक्षा आहे. सातपुड्यातील सुकी नदीवरील सुकी धरण आणि परिसर पर्यटकांसाठी आकर्षणाचा विषय आहे. येथे देखील धरणाच्या खालच्या भागात बाग, पर्यटकांसाठी बसण्याची सुविधा होणे गरजेचे आहे. या बाबतचा प्रस्ताव देखील रवाना झालेला आहे मात्र, त्याची दखल घेतली गेलेली नाही. उपलब्ध माहितीनुसार हे प्रस्ताव एमटीडीसीकडे पडून आहे. यावलचे भाजप आमदार हरिभाऊ जावळे हे बीओटी तत्वावर सुकी धरण, तर चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील हे गिरणा धरण पर्यटन स्थळ होण्यासाठी आग्रही आहेत.

Check Also

news-24

हिंसामय गुन्ह्यांत नगर राज्यात टॉपला

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – खून, दरोडे, बलात्कार अशा हिंसामय गुन्ह्यांत कायम अशांत असणारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *