facebook
Saturday , December 3 2016
Home / Featured / दहावीनंतरच्या करिअरबाबत मार्गदर्शन
news-1

दहावीनंतरच्या करिअरबाबत मार्गदर्शन

आवाज न्यूज नेटवर्क –

मुंबई – दहावीची परीक्षा सर्वच विद्यार्थ्यांच्या करिअरमधली अत्यंत महत्त्वाची परीक्षा मानली जाते. कारण या परीक्षेनंतर विद्यार्थ्यांचे करिअर खऱ्या अर्थाने घडू लागते. वाढत्या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर करिअरची योग्य निवड नेहमीच महत्त्वाची ठरते. दहावीचा अभ्यास कसा करावा, शेवटच्या दिवसांमध्ये दहावीच्या अभ्यासाचे नियोजन कसे करावे, दहावीनंतरच्या करिअरच्या विविध संधी, शिक्षणपद्धतीमध्ये होणारे महत्त्वाचे बदल, विविध शाखांच्या प्रवेश परीक्षांची तयारी कशी करायची तसेच दहावीनंतर कोणती शाखा निवडावी याबद्दलच्या अनेक शंका विद्यार्थ्यांबरोबरच त्यांच्या पालकांनाही असतात. या सर्व प्रश्न आणि शंकांचे निरसन करण्यासाठी ‘करिअर दहावीनंतरचे’ या विशेष सेमिनार्सचे आयोजन करण्यात आले आहे. आठवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थी आणि पालकांसाठी ही सेमिनार्स अधिक उपयुक्त आहेत.

ही सेमिनार्स पुढील ठिकाणी होणार आहेत.•२ डिसेंबरः संध्या. ६ वाजताः आचार्य अत्रे सभागृह, शंकर राव चौक, कल्याण (प.).•२ डिसेंबरः संध्या. ६ वाजताः नवी मुंबई तामीळ संघम हॉल, २/सी१, सेक्टर ९ए, वाशी बस डेपोजवळ, वाशी.•३ डिसेंबरः संध्या. ६ वाजताः शुभम पार्टी हॉल, डी २३२, पहिला मजला, शांती शॉपिंग सेंटर, मीरा रोड स्टेशन जवळ, मीरा रोड (पू.).•३ डिसेंबरः संध्या. ६ वाजताः फाइन आर्टस सोसायटी ऑडिटोरिअम, आर.सी.मार्ग, चेंबूर फ्लायओव्हरनजिक, चेंबूर (पू.)•४ डिसेंबरः सकाळी १० वाजताः ज्ञानविहार लायब्ररी, तिसरा मजला, प्रबोधनकार ठाकरे ऑडिटोरिअम कॅम्पस, बोरीवली (प.).•४ डिसेंबरः सकाळी १० वाजताः हॉटेल रेनबो पॅलेस, सिद्धिविनायक इंडस्ट्रिअल इस्टेट, नारंगी बायपास रोड, विरार (पू.)•४ डिसेंबरः संध्या. ५ वाजताः पाणिनी सभागृह, ठाणे कॉलेज कॅम्पस, सिडको बसस्टॉप शेजारी, ठाणे (प.).•४ डिसेंबरः संध्या. ५ वाजताः साठ्ये कॉलेज, दुसरा मजला, रूम नं. २१७, विलेपार्ले (पू.).

अधिक माहितीसाठी संपर्क- ८८८८८८४१५९/७७७४०८६०५४

Check Also

news-24

हिंसामय गुन्ह्यांत नगर राज्यात टॉपला

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – खून, दरोडे, बलात्कार अशा हिंसामय गुन्ह्यांत कायम अशांत असणारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *