facebook
Saturday , December 3 2016
Home / Featured / पाचशेच्या नोटांची छपाई नाशिकमध्येच
news-10

पाचशेच्या नोटांची छपाई नाशिकमध्येच

आवाज न्यूज नेटवर्क –

नाशिक – नाशिकरोडच्या करन्सी प्रेसमध्ये पाचशे रुपयांच्या नोटांचे उत्पादन थांबवले जाणार असल्याची केवळ अफवाच आहे. या प्रेसमध्ये पाचशेची नवी नोट छापण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे, असे स्पष्टीकरण प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे यांनी दिले आहे.

नाशिकरोड आणि देवास (मध्य प्रदेश) येथील पाचशे रुपयांच्या नोटांचे उत्पादन थांबविण्यात आले असल्याचे तसेच रिझर्व्ह बँकेच्या म्हैसूर प्रेसमध्ये पाचशेच्या नोटांची छपाई केली जाणार असल्याचे चुकीचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर प्रेस कामगारांमध्ये खळबळ उडाली. मात्र, पाचशेच्या नोटा छापण्याचे काम नाशिक प्रेसमध्येच सुरूच राहणार असल्याचे सरकारी सूत्रांनी तसेच गोडसे यांनी स्पष्ट केले. सरकारने पाचशे व एक हजाराच्या जुन्या नोटा रद्द केल्यानंतर नोटांची तीव्र टंचाई जाणवत आहेत. दोन हजारांच्या नोटांमुळे टंचाई दूर होण्याएवजी सुट्याची समस्या वाढली आहे. देशात सध्या पाचशेच्या नोटांची टंचाई आहे. नाशिकमध्ये या नोटा छापूनही त्या मुंबई, पुणे व देशाच्या अन्य भागात प्रथम वितरित करण्यात आल्या. पाचशेच्या नोटांची टंचाई दूर करण्यासाठी सरकारने म्हैसूरच्या प्रेसमध्ये देखील हे काम सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. या प्रेसमध्येच दोन हजाराची नोट छापली जात आहे.

क्षमता कमी, जिद्द मोठी
नाशिकरोड आणि देवास या प्रेस महामंडळाच्या मालकीच्या आहेत. नाशिकरोड प्रेसची स्थापना १९२५ साली ब्रिटिशांनी केली. येथील मशिन्स १९८५ साली उभारण्यात आल्या. त्यांचे सर्व्हिसिंग व आधुनिकीकरणही झालेले नाही. त्यामुळे छपाईचा वेग कमी आहे. या उलट रिझर्व्ह बँकेच्या म्हैसूर आणि सालगोणी प्रेस आधुनिक आहेत. मशिन्सची संख्याही जास्त आहे. नाशिक व देवासच्या प्रेसमध्ये पाचशेच्या पाच दशलक्ष नोटा दर दिवसाला छापल्या जातात. जिद्दी कामगार सुटी न घेता तीन शिफ्टमध्ये काम करत असल्यामुळे हे उत्पादन वाढले आहे. १३ ते २४ नोव्हेंबर दरम्यान नाशिकच्या प्रेसने विविध प्रकारच्या तीनशे दशलक्ष नोटा छापून देशभरात पाठवल्या आहेत. अशाच वेगाने काम सुरू राहिल्यास देशातील पाचशेच्या नोटांची टंचाई सात महिन्यात दूर होईल.

म्हैसूरला समस्या
नाशिकरोड प्रेसकडून पाचशेच्या नोटा छपाईचे काम काढून म्हैसूरला दिल्यास त्यात अधिक वेळ जाईल आणि पाचशेच्या नोटटंचाईत भरच पडेल. तेथे छापल्या जात असलेल्या दोन हजारांच्या नोटांची छपाई थांबवून पाचशेची छपाई करायची झाल्यास तंत्रज्ञान, संगणक, मशिन्स यामध्ये आवश्यक बदल करावे लागतील. त्यासाठी सुमारे महिना लागेल. त्याऐवजी नाशिकरोड व देवास प्रेसमध्ये पाचशेच्या नोटा छापण्याचे काम सुरूच ठेवल्यास नोटाटंचाई लवकर कमी होण्यास मदत मिळणार आहे.

Check Also

news-24

हिंसामय गुन्ह्यांत नगर राज्यात टॉपला

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – खून, दरोडे, बलात्कार अशा हिंसामय गुन्ह्यांत कायम अशांत असणारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *