facebook
Saturday , December 3 2016
Home / Featured / शिवसेना हा केवळ टक्केवारीचा पक्ष
news-5

शिवसेना हा केवळ टक्केवारीचा पक्ष

आवाज न्यूज नेटवर्क –

पुणे – ‘शिवसेनेने महाराष्ट्रात जी कामे केली, ती बाळासाहेबांनी केली आहेत. उद्धव ठाकरे यांनी काय भांडवल टाकलं त्यात? अहो, हे नुसते व्याजच खात आहेत. शिवसेना हा टक्केवारीचा पक्ष आहे,’ अशी टीका माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी बुधवारी शिवसेनेवर केली.
काँग्रेस कमिटी हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने हडपसर गांधी चाैकात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी राणे बोलत होते. माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, विधान परिषद गटनेते शरद रणपिसे, माजी आमदार उल्हास पवार, पुणे शहर अध्यक्ष रमेश बागवे, महिला प्रदेशाध्यक्ष कमल व्यवहारे, माजी आमदार मोहन जोशी, महापालिका गटनेते अरविंद शिंदे, ब्लॉक अध्यक्ष प्रशांत तुपे, चंद्रकांत मगर, नगरसेवक सतीश लोंढे, नगरसेविका विजया वाडकर, कविता शिवरकर, रईस सुंडके, नितीन आरु, प्रशांत सुरसे, शफी इनामदार आदी उपस्थित होते.
राणे म्हणाले, ‘अकरा लाख रुपयांचा ड्रेस घालणारे व परदेशवारी करणारे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना देशातील गरीब जनतेचे घेणे देणे नाही. अच्छे दिन आणू न शकलेले हे सरकार अपयशी ठरले असून, जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी रोज एक नवीन निर्णय घेत आहे. त्यांनी केलेली एकही घोषणा राज्य व केंद्र सरकारने पूर्ण केलेली नाही. शेतक-यांची व्यथा या सरकारला समजत नसल्याने ४५०० कोटी पीक कर्जासाठी आवश्यकता असताना केवळ ४५० कोटी मंजूर केले. पैशातून सत्ता व सत्तेतून पैशाचे राजकारण सरकार करीत आहे.’
बाळासाहेब शिवरकर म्हणाले, ‘काँग्रेस पक्षाने गरिबांसाठी खूप कामे केली. मात्र आम्ही कधीही मार्केटिंग केले नाही.’

Check Also

news-24

हिंसामय गुन्ह्यांत नगर राज्यात टॉपला

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – खून, दरोडे, बलात्कार अशा हिंसामय गुन्ह्यांत कायम अशांत असणारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *