facebook
Tuesday , January 24 2017
Breaking News
Home / Featured / शरीरविक्रयाचा व्यवसाय सुरू असलेल्या सत्यम लॉजवर बुलडोझर

शरीरविक्रयाचा व्यवसाय सुरू असलेल्या सत्यम लॉजवर बुलडोझर

आवाज न्यूज नेटवर्क –

मुंबई  – उपवन येथील सत्यम लॉजच्या मालकाने चक्क जमिनीखाली तीन मजली तळघर तयार करून तब्बल २९० खोल्यांचे बांधकाम केले होते. तिथे शरीरविक्रयाचा व्यवसाय सुरू असल्याचे पुरावे पालिकेच्या हाती आले असून पालिकेने हा लॉज अवघ्या काही तासांत जमीनदोस्त केला. याच परिसरातील आणखी सात ते आठ अन्य लॉजवरही पालिकेने बुलडोझर चालविला आहे.

रस्त्यांवरील अतिक्रमणांसह ऑर्केस्ट्राच्या नावाखाली चालविले जाणारे डान्सबार आणि अनैतिक धंदे चालणारे लॉज ठाणे पालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या रडारवर आहेत. गुरुवारी पालिकेची पथके उपवन येथील सत्यम लॉजवर कारवाई करण्यासाठी धडकली. समोरून केवळ ३० बाय ३० आकाराचे बांधकाम असलेल्या या लॉजची पाहणी पालिका अधिकाऱ्यांनी सुरू केल्यानंतर त्यांना हादराच बसला. लॉजच्या तळघरात एकाखाली एक असे तीन मजले तयार करण्यात आले होते. तिथे सव्वाशे ते दीडशे चौरस फुटांच्या तब्बल २९० खोल्या आढळल्या.

Check Also

विकास कामे झाली, पण ठराविक लॉबीचीच झाली – यशवंत भोसले

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *