facebook
Tuesday , May 23 2017
Breaking News
Home / Featured / इंदू मिल प्रकरणी आंदोलकांवर खटले कायम

इंदू मिल प्रकरणी आंदोलकांवर खटले कायम

आवाज न्यूज नेटवर्क –

मुंबई – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी दादरच्या चैत्यभूमीनजीकची इंदू मिलची साडेबारा एकर जागा मिळावी, यासाठी मिलमध्ये घुसून जागेचा कब्जा करणाऱ्या रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांवरील खटल्यातील चौकशीचा ससेमिरा अद्याप सुरूच आहे. याबाबत शिवाज‌ी पार्क पोलिसांनी दाखल केलेल्या खटल्याच्या सुनावणीमुळे आठवले गटातील प्रमुख पदाधिकारी जेरीस आले आहेत.

इंदू मिलच्या जागेवर बाबासाहेबांच्या स्मारकाचे प्रत्यक्ष काम सुरू करण्यासाठी मिलच्या आतील जागेवरील जुनाट बांधकाम पाडण्यास एमएमआरडीएने सुरुवात केली आहे. स्मारकाचे प्रत्यक्षात काम कधी सुरू होईल याबाबत आंबेडकरी चळवळीत औत्सुक्य आहे. ही जागा स्मारकासाठी देण्याची घोषणा केली. यासाठी रिप‌ब्लिकन सरसेनानी आनंदराज आंबेडकर आणि नंतर रामदास आठवले यांच्या गटाने मिलचा ताबा घेण्याचे आंदोलन केले होते.

इंदू मिलच्या जागेचा ताबा घेऊन राष्ट्रीय संपत्ती व मालमत्तेचे नुकसान केल्याबद्दल शिवाजी पार्क पोलिसांनी रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे, किर्ती ढोले, चंद्रशेखर कांबळे, सचिन मोहिते आणि ममता आढांगळे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले होते. किमान जन्मठेपेची शिक्षा होईल अशी कलमे आंदोलकांवर लावण्यात आल्याचे सांगण्यात येते. आंदोलन करणाऱ्या रिपब्लिकन गटाचे नेते रामदास आठवले हे केंद्रात राज्यमंत्री आहेत पण त्यांचे कार्यकर्ते राजक‌ीय आंदोलनात सहभागी झाल्याबद्दल अजूनही न्यायालयात हेलपाटे मारीत आहेत. सत्ताधारी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते अशा केसेसमधून बाहेर पडणार की हेलपाटे मारीत राहणार, असा सवाल आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *