facebook
Tuesday , March 28 2017
Breaking News
Home / Featured / कोट्यवधींचा निधी अखर्चित

कोट्यवधींचा निधी अखर्चित

आवाज न्यूज नेटवर्क –

अहमदनगर – जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या आचारसंहितेचे सावट व योजनांचा अखर्चित निधी खर्च करण्यासाठी १५ डिसेंबरची दिलेली अंतिम मुदत जवळ येत चालल्याने जिल्हा परिषदेत सध्या साहित्यवाटपाचे एकामागोमाग एक आदेश निघत आहेत. सर्वच विभागांचा निधी अखर्चित असून हा निधी खर्च करण्यासाठी अधिकाऱ्यांची धावपळ सुरू आहे. आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी निधी खर्च करण्याचा अधिकाऱ्यांचा प्रयत्न आहे.

निधी उपलब्ध असतानाही, योजना वेळेत पूर्ण करण्यात एकही विभाग यशस्वी ठरलेला नाही. काही विभागांचा मागील वर्षातीलही निधी खर्च झालेला नाही. त्यातच पुढील वर्षात फेब्रुवारी महिन्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी आचारसंहिता जाहीर होण्याआधीच निधी खर्च करणे आवश्यक असल्याने १५ डिसेंबर अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. या मुदतीच्या आत निधी खर्च करण्याची तंबी अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.

निधीची पळवापळवी

विभागांकडून योजनांना प्रशासकीय व तांत्रिक मान्यता दिल्यानंतर साहित्य खरेदी करून पुरवठा आदेश दिले जात आहेत. दुसरीकडे पदाधिकारी सदस्यही आपल्याच गटात जास्तीचा निधी वळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. काही पदाधिकारी दिवसभर जिल्हा परिषदेतच ठाण मांडून असतात. फाइल मंजूर करून घेण्यासाठी अधिकाऱ्यांच्या दालनात तासन तास थांबून राहतात.

योजनांसाठी प्रयत्न

कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना पन्नास टक्के अनुदानावर ७८५ कडबाकुट्टी यंत्रे दिली जाणार आहेत. यासाठी पुरवठादार संस्थांची नियुक्ती करून पुरवठ्याचे आदेश दिले आहेत. त्यापाठोपाठ समाजकल्याण विभागानेही मागासवर्गीय शेतकऱ्यांना १६२ कडबाकुट्टी यंत्रे, ११५ इलेक्ट्रिक मोटार, ३० अनुदानित वसतीगृहांना सोलर वॉटर हीटर पुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यातील दलित वस्त्यांत पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी ग्रामपंचायतींना ५६ कोटींचा निधी मंजूर केला आहे. आरोग्य विभागाकडून प्राथमिक आरोग्य केंद्रांची दुरुस्ती, बांधकाम, औषध खरेदीचे आदेश दिले जात आहेत. निवडणुकांच्या आचारसंहितेच्या सावटात वर्षानुवर्षे रखडलेल्या योजना झटपट मार्गी लागत असल्याने लाभार्थ्यांना साहित्य लवकर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *