facebook
Thursday , May 25 2017
Breaking News
Home / Featured / जागतिक कॅथलॅब ‘रोपळेकर’मध्ये

जागतिक कॅथलॅब ‘रोपळेकर’मध्ये

आवाज न्यूज नेटवर्क –

औरंगाबाद – जागतिक दर्जाच्या आधुनिक तंत्रज्ञानाची व जर्मन बनावटीची डिजिटल कॅथलॅब ‘रोपळेकर, रुबी हार्ट केअर सेंटर’मध्ये दाखल झाली असून, येत्या दोन दिवसांत ती रुग्णसेवेत येणार आहे. डोक्यापासून ते पायापर्यंतच्या कुठल्याही भागाची अँजिओग्राफी अधिकाधिक अचुकतेसह अधिकाधिक सुरक्षितपणे करण्याची आणि त्यामुळेच अँजिओप्लास्टीदेखील तितक्याच अचुकतेने करण्याची सोय या कॅथलॅबद्वारे शक्य झाल्याची माहिती रुग्णालयाने रविवारी पत्रकार परिषदेत दिली.
रुग्णालयातील सिमेन्स कंपनीच्या ‘आर्ट्रिझ झी प्युअर कॅथलॅब’द्वारे ८५ टक्के कमी रेडिएशन डोसमध्ये उत्कृष्ठ दर्जाची अँजिओग्राफीची प्रतिमा मिळते आणि कमी रेडिएशनमुळेच रुग्णाला कॅन्सर व इतर आजार होण्याची शक्यता नगण्य होते. यातील ‘क्लिअर स्टेन्ट लाइव्ह’ या सॉफ्टवेअरमुळे स्टेन्टचे द्रुष्यिकरण अधिक मोठ्या व सुस्पष्ट प्रतिमेसह होते, ज्यामुळे अँजिओप्लास्टी व इतर उपचार अत्यंत अचुकतेने व नेमक्या जागी करणे शक्य होते. त्याचवेळी ऑपरेशन टेबलवरील रुग्णाच्या उंची व वजनानुसार रेडिएशनचा डोस संबंधित रुग्णाला उपकरणाद्वारा सोडला जातो. तसेच डोक्यापासून पायापर्यंतच्या कुठल्याही भागाची अँजिओग्राफी रुग्णाची जागा न बदलता व पाहिजे त्या कोनांसह व सुस्पष्ट प्रतिमांसह करता येते.
बालरुग्णांमधील जन्मजात हृदयविकार, हृदयातील पडद्यामधील छिद्र आदींसाठीही हे उपकरण अत्यंत उपयुक्त ठरते. कोरोनरी अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, स्टेन्टिंग, पेसमेकरसाठी हे उपकरण सद्यस्थितीत सर्वोत्तम आहे. अनियमित हृदयाच्या स्पंदनांचा आजार नियंत्रित करण्यासाठीदेखील या उपकरणाचा उपयोग होतो. मेंदूच्या व हाता-पायांच्या रक्तवाहिन्यांच्या चिकित्सेसाठीही हे उपकरण उत्तम ठरते, असे रुग्णालयाचे संचालक डॉ. सतीश रोपळेकर व डॉ. कांचन रोपळेकर यांनी सांगितले. या प्रसंगी ‘ओझोन ग्रुप’चे डॉ. बालाजी आसेगावकर, डॉ. प्रमोद अपसिंगेकर, डॉ. अजित हिवरकर आदींची उपस्थिती होती.

गोरगरीबांना अत्युच्च तंत्रज्ञान
रुग्णालयातील या अत्युच्च तंत्रज्ञानाचा लाभ राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेतील रुग्णांना मिळणार आहे. राज्य-केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या योजनाही रुग्णालयामध्ये सुरू आहेत. तसेच ‘इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी’तर्फे (इगनू) ‘क्लिनिकल कार्डिओलॉजी’ या विषयातील दोन वर्षांचा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमही रुग्णालयामध्ये राबविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *