facebook
Friday , May 26 2017
Breaking News
Home / Featured / सहकारी संस्थांचा आज राष्ट्रीयीकृत बँकांवर मोर्चा

सहकारी संस्थांचा आज राष्ट्रीयीकृत बँकांवर मोर्चा

आवाज न्यूज नेटवर्क –

कोल्हापूर – सध्याच्या परिस्थितीत अतिशय तुटपुंजे पैसे देऊन ग्रामीण भागातील जनतेची ससेहोलपट थांबवण्यासाठी जिल्हा बँक तसेच सहकारी संस्थांना दररोज आवश्यक पैसे मिळावेत या मागणीसाठी केडीसीसी संलग्न सहकारी संस्था नोट व रोकड बंदी अन्याय कृती समितीच्यावतीने राष्ट्रीयीकृत बँका आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून सोमवारी (ता. ५) करन्सी चेस्टचे कामकाज बंद पाडण्यात येणार आहे. जिल्ह्यातील साखर कारखाने, सूत गिरण्या, पणन संस्था, सेवा सोसायटी, अर्बन बँक, पतसंस्था, दूध संस्था, अंगणवाडी कर्मचारी, बचत गटांच्या महिला या मोर्चांमध्ये सहभागी होणार आहेत.

मोर्चा दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार असून सोमवारनंतर परिस्थितीत बदल झाला नाही तर जोपर्यंत पैसे मिळत नाहीत, तोपर्यंत करन्सी चेस्टच्या चार बँकांचे कामकाज चालू दिले जाणार नाही. त्यामुळे जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर बनण्याची चिन्हे दिसत आहेत.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *