facebook
Sunday , March 26 2017
Breaking News
Home / Featured / गजा मारणेला पुण्यात आणण्यासाठीराजकीय नेतेमंडळींची धडपड

गजा मारणेला पुण्यात आणण्यासाठीराजकीय नेतेमंडळींची धडपड

आवाज न्यूज नेटवर्क –

पुणे – कुख्यात गुंड गजा मारणे याला कोल्हापूर तुरुंगातून पुण्यात आणण्यासाठी राजकीय स्तरावरून हालचाली सुरू झाल्या आहेत. मारणेला पुण्यात आणण्यासाठी काही राजकीय नेतेमंडळींकडून तुरुंग महानिरीक्षक कार्यालयातील फोन खणखणू लागले आहेत. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘त्या’ राजकीय नेत्यांना मारणेचे पुण्यातील तुरुंगामधील वास्तव्य फायद्याचे असल्याने हा घाट घातला जात आहे.

गुंड बाबा बोडके याच्यावरून नुकताच गदारोळ झाला आहे. मारणे याला पुण्यात आणण्यासाठी घाट घातला जात आहे. मारणे याची पत्नी कोथरूड येथील नगरसेविका आहे. त्याशिवाय तो एका बड्या राजकीय नेत्याचा लाडका ‘कार्यकर्ता’ आहे. मारणे हा येरवडा जेलमध्ये आल्यास त्याच्या साथीदारांकडून तो निरोपाकरवी अनेक झोपडपट्ट्यांमधील मतदान तो ‘फिरवू’ शकतो, अशी त्याची ख्याती आहे. त्याच्या पुण्यातील गुन्हेगारी साम्राज्यात आणि नेटवर्कमध्ये योग्य वेळी योग्य तो संदेश पाठवण्यासाठी त्याचे पुण्यात असणे आवश्यक मानले जात आहे.

मारणेला पुण्यात आणण्यासाठी एका बड्या राजकीय नेत्याकडून तुरुंगामधील वरिष्ठ अधिकाऱ्यांना वारंवार फोन करण्यात आले होते. या नेत्याकडून मारणेला पुण्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच भोपाळ येथील तुरुंग संशयित दहशतवाद्यांनी फोडल्याची घटना घडली आहे. त्यामुळे तुरुंगामधील संघटित टोळ्यांबाबतचे नियम अधिक कडक करण्यात आले आहेत. भोपाळ येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर मारणेला पुण्यात आणणे धोकादायक असल्याने त्याला पुण्यात आणण्यात येणार नाही, अशी प्रतिक्रिया उच्चपदस्थ अधिकाऱ्याने व्यक्त केली.

मारणे आणि नीलेश घायवळ टोळीत भडका उडल्यानंतर खूनसत्र सुरू झाले होते. पुणे आणि ग्रामीण पोलिसांनी मारणेविरुद्ध ‘मोक्का’ कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याची रवानगी येरवडा तुरुंगात केली होती. तुरुंग प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना म्हणून मारणेला कोल्हापूर तुरुंगामध्ये ठेवले आहे. त्याची टोळी वेगवेगळ्या जेलमध्ये विभागून ठेवण्यात आल्याने या गुन्हेगारांची तुरुंगामधील दादागिरीही आटोक्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *