facebook
Friday , May 26 2017
Breaking News
Home / Featured / जयललिता यांची एकूण संपत्ती किती जाणून घ्या

जयललिता यांची एकूण संपत्ती किती जाणून घ्या

चेन्नई : एआयएडीएमकेच्या सुप्रिमो आणि तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी ११३.७३ कोटींची संपत्ती एप्रिल २०१५ रोजी घोषीत केली होती. ही त्याच्या गेल्या वर्षी जाहीर केलेल्या संपत्तीपेक्षा ३.४० कोटी कमी होती.

चल आणि अचल संपत्ती

जयललिता यांची चल संपत्ती एकूण ४१.६३ कोटी आहे आणि अचल संपत्ती सुमारे ७२.०९ कोटी आहे. एकूण संपत्ती ११३.७३ कोटी असल्याचे त्यांनी २०१५ रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकी वेळी जाहीर केली होती. त्यांनी राधाकृष्ण नगर विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी प्रतिज्ञापत्रात ही संपत्ती जाहीर केली होती.

रोख रक्कम

त्यांच्याकडे रोख रक्कम म्हणून ४१ हजार रुपये आहे. तसेच त्यांच्यावर २.०४ कोटी रुपयांचे देणे असून शेती हे त्यांनी आपले व्यवसाय-पेशाच्या रकान्यात लिहिले होते.

गुंतवणूक आणि शेअर्स

विविध कंपन्यांत गुंतवणुकीच्या रकान्यात त्यांनी लिहिले की, बंगळुरूच्या स्पेशल सेशन कोर्टाने २००४ सालातील एका प्रकरणात पोलिसांनी सर्व ठेवी आणि शेअर्स पोलिसांनी जप्त केले आहे. ते न्यायालयाच्या ताब्यात आहेत.  उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती प्रकरणाचा या ठिकाणी त्यांनी उल्लेख केला आहे.

राहते घर, संपत्ती आणि व्यावसायिक इमारती

जयललिता यांचे राहते घर पोईस गार्डन येथे आहे. याला ‘वेदा निलायम’ असे नाव आहे. २४ हजार स्वेअर फुटांवर २१ हजार स्वेअर फुटांचे बांधकाम आहे. त्याची आजची किंमत ४३.९६ कोटी आहे.  त्यांनी आपल्या आईसह १९६७ मध्ये ही संपत्ती १.३२ लाखांना विकत घेतली होती.

त्यांनी तेलंगणा येथील रंगारेड्डी जिल्ह्यातील जिथीमेथला गावात १४.५० एकर शेत जमीन घेतली आहे. तर तामिळनाडू येथे चेय्यूर आणि कांचीपुरूम खेड्यात ३.४३ एकर जमीन घेतली आहे.

तसेच जयललिता यांनी १९६८ मध्ये तेलंगणा येथे आपल्या आईसह संपत्ती विकत घेतली तसेच चेय्यूर येथे १९८१ मध्ये वित घेतली.

त्यांच्या नावावर चार व्यावसायिक इमारती आहेत, त्यात चेन्नईत एक आणि हैदराबाद येथे एका इमारतीचा समावेश आहे.

कार आणि वाहने

जयललिता यांच्याकडे दोन टोयोटा प्राडो एयूव्ही आहेत. त्यांची किंमत ४० लाख रुपये आहे. तसेच त्यांच्याकडे मालकीची टेम्पो ट्रॅव्हलर, एक टेम्पो ट्रॅक्स, महिंद्रा जीप आणि १९८० मधील एक अँबेसेडर कार, महिंद्र बलेरो, स्वराज माझदा मॅक्सी, आणि १९९० ची क्वॉन्टेसा कार आहे. या सर्वांची किंमत ४२ लाख २५ हजार आहे.

सोने आणि चांदीचे आभूषणे

तामिळनाडूच्या मुख्यमंत्री  जयललिता यांच्याकडे २१.२८०.३०० ग्रॅम म्हणजे २१ किलो सोने आहे. पण उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती प्रकरणाचा हे सर्व सोने कर्नाटक सरकारच्या ताब्यात आहेत. तसेच ही संपत्तीचे प्रकरण सुप्रीम कोर्टात प्रलंबित असल्याचेही त्यांनी सांगितले होते.

तसेच त्यांच्याकडे १२५० किलोचे चांदीची भांडी आणि साहित्य आहे. त्याची किंमत ३ कोटी १२ लाख ५० हजार आहे.

कंपन्यांत गुंतवणूक

जयललिता यांनी पाच कंपन्यात पाटर्नर म्हणून पैसा गुंतवला आहे. याची किंमत २७.४४ कोटी रुपये आहे.  यात श्री जया पब्लिकेशन, सासी एन्टरप्राइजेस, कोडानाड इस्टेट, रॉयल व्हॅली फ्लोरिटेक एक्सपर्ट आणणि ग्रीन टी इस्टेट यांचा समावेश आहे.

त्याचे एनएसएस, पोस्टल सेव्हींग सर्व्हिस, इन्शुरन्स पॉलिसी नाही. त्यांना कोणतेही पर्सनल लोन घेतले नाही.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *