facebook
Wednesday , May 24 2017
Breaking News
Home / Crime / नवऱ्याने घोटला पत्नीचा गळा

नवऱ्याने घोटला पत्नीचा गळा

आवाज न्यूज नेटवर्क –

औरंगाबाद – गौताळा अभयारण्यात २० नोव्हेंबर रोजी सापडलेल्या महिलेच्या प्रेताचे रहस्य अखेर उलगडले आहे. पिंपळगाव (ता. चाळीसगाव) येथील रवींद्र बाजीराव शिरसाठ यानेच आपल्या पत्नीचा खून करून ती हरविल्याची तक्रार नोंदविल्याचे तपासात उघड झाले आहे.
चाळीसगाव पोलिस ठाण्यात शिरसाठ याने ३ डिसेंबर रोजी आपली पत्नी अर्चना उर्फ गुड्डी (वय २४) ही घरातून कुणालाही न सांगता १८ नोव्हेंबरपासून निघून गेल्याची तक्रार नोंदविली होती. हा गुन्हा दाखल होण्यापूर्वी या अर्चनाची माहिती कन्नड पोलिसांकडून चाळीसगाव पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे त्यांनी अर्चनाच्या माहेरील मंडळीकडे (रा.कृष्णापुरी, त्र्यंबकनगर, पाचोरा) कसून चौकशी सुरू केली. तिची आई सिंधू बागुल व भाऊ किरण बागुल यांना गौताळा येथील सापडलेल्या मृत महिलेचे फोटो, कपडे, अंगावरील दागिने दाखवले. त्यावरून त्यांनी ही आपलीच मुलगी असल्याची शंका व्यक्त केली. त्यामुळे चाळीसगाव पोलिसांनी कन्नड पोलिसांशी संपर्क साधला. पोलिस निरीक्षक शिवलाल पुरभे, पोहेकॉ. कैलास निंभोरकर यांनी मयताच्या प्रेताची ओळख पटविण्यासाठी घाटीच्या शवागारात ठेवलेला मृतदेह त्यांना दाखवला. त्यांनी हे प्रेत अर्चनाचे असल्याचे सांगितले. कन्नड पोलिसांनी खात्री पटल्यानंतर अंत्यविधीसाठी हे प्रेत त्यांच्या स्वाधीन केले.

पतीची कोठडीत रवानगी
पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी व उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरु यांनी तपासाची चक्रे फिरवत मयताचा पती रवींद्र शिरसाठ यास ताब्यात घेतले. विश्वासाने विचारपूस केली असता त्याने अनैतिक संबंधातून पत्नीचा खून केल्याची कबुली दिली. यावरून कन्नड पोलिसांना त्यास अटक करून त्याची पाच दिवसांच्या पोलिस कोठडीत रवानगी केली.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *