facebook
Tuesday , May 23 2017
Breaking News
Home / Featured / पाहुणे सेवेकरी नोटांमुळे चिंतेत

पाहुणे सेवेकरी नोटांमुळे चिंतेत

आवाज न्यूज नेटवर्क –

नागपूर – विधिमंडळ अधिवेशनासाठी बाहेरून आलेले पाहुणे सेवेकरींना नोटाबंदीचा फटका बसला. जवळ मोजकीज रोख असल्याने बाहेरून आलेले काही कर्मचारी रविवारी जेवणालादेखील मुकले. विधिमंडळ सभागृहांच्या आंत नोटाबंदीच्या विषयावरून विरोधकांनी पहिल्‍याच दिवशी सरकारला घेरण्याची तयारी केली. आंतमध्ये वातावरण असे तापले असताना बाहेर विविध ठिकाणी तैनातीवर असलेल्या कर्मचाऱ्यांनादेखील या निर्णयाची झळ पोहोचली.

विधिमंडळ अधिवेशनासाठी संपूर्ण सरकार नागपुरात डेरेदाखल असते. पोलिस, विविध विभागांतील कर्मचारी, अधिकारी असे शेकडो पाहुणे यादरम्यान राज्यभरातून नागपुरात येतात. त्यांचे जेवण व निवासाची सोय विविध ठिकाणी असते. पण अनेकदा या कर्मचाऱ्यांना जेवणाचा खर्च स्वत: करावा लागतो. त्याचा भत्ता मिळत असला तरी आगाऊ त्यांनाच हा पैसा खर्च करावा लागतो. अशांना सोमवारी नोटाबंदीचा फटका बसला.

विधिमंडळ अधिवेशन सोमवारी सुरू झाले तरी हे कर्मचारी तीन‍-चार दिवस आधीच शहरात आले होते. बँकेत, एटीएममध्ये रांगा असल्याने या कर्मचाऱ्यांना मोजकी रोख घेऊनच यावे लागले. शहरात येऊन आता जवळपास आठवडा होत असल्याने या कर्मचाऱ्यांकडील रोख संपत आली आहे. नवीन रोख काढण्यासाठी बँकेत जाता येणे अशक्य आहे. कारण इथे खाते नसताना बँकेतून रोख काढणार तरी कशी? तर एटीएममधून रोख काढायची झाल्यास एटीएम ठप्प पडलेले. विधान भवन परिसरात मोजकेच एटीएम असून ते बंद आहेत. तर ड्युटी सोडून एटीएम शोधत कुठे जाणार? पोलिसांना तर त्यांची जागा सोडून हलतादेखील येत नाही. अन्य कर्मचाऱ्यांना साहेबांच्या नजरेसमोरून हलता येणे अशक्य. आता पुढील सुट्टी आली की त्यांना रोख काढता येणार आहे. त्यासाठी आणखी पाच दिवस आहेत. पाच दिवस रोख पुरविण्यासाठी काही कर्मचारी दिवसातून एकदाच जेवण घेत आहेत. नोटाबंदीचा भीषण फटका पाहुण्यांना बसल्याचे चित्र आहे.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *