facebook
Wednesday , March 29 2017
Breaking News
Home / Featured / महाराष्ट्र खाद्य व टुरिझम महोत्सव जळगावला

महाराष्ट्र खाद्य व टुरिझम महोत्सव जळगावला

आवाज न्यूज नेटवर्क –

जळगाव – के. ई. डब्ल्यू. सोसायटी, मराठी प्रकाशन आणि परेश फाउंडेशनतर्फे २३ ते २७ डिसेंबर, सागर पार्कवर जळगावकर खवैय्यांसाठी महाराष्ट्र खाद्य व टुरिझम महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात प्रसिद्ध शेफ विष्णु मनोहर आणि संजय आंबेगावकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. विशाल कामत यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती जमील देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जळगावला बहिणाबाई महोत्सव, खान्देश महोत्सव होत असून, त्यास जळगावकरांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो हे लक्षात घेऊन राज्याच्या विविध भागातील प्रसिद्ध प्रत्येकी ४० व्हेज आणि नॉनव्हेज खाद्यपदार्थ या महोत्सवात शेफ विष्णू मनोहर आणि शेफ संजय आंबेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करून उपलब्ध करून दिले जाणार आहेत. व्हेज आणि नॉन व्हेजसाठी दोन स्वतंत्र भाग करण्यात येणार आहे. खवैय्यांना नागपुरी, मालवणी, कोल्हापुरी, मुंबई स्पेशल पदार्थ उपलब्ध असतील. याशिवाय २४ डिसेंबर रोजी जळगावकर महिलांसाठी पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. परीक्षक म्हणून महाराष्ट्र किचन क्विन प्राजक्ता शहापूरकर उपस्थित राहणार आहेत. महिलांनी स्पर्धेचे पदार्थ घरून करून आणायचे आहेत. जळगावकरांना या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता घेता सहलीचे आयोजन करण्यासाठी व मार्गदर्शनासाठी विविध टुरिस्ट कंपन्यांशी बोलता येणार आहे. त्यासाठी अनेक कंपन्यांना या महोत्सवात निमंत्रित केले असल्याची माहिती जमील देशपांडे यांनी दिली.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *