facebook
Wednesday , May 24 2017
Breaking News
Home / Featured / सुशीकुमार शिन्देकडून शहीद कुणाल गोसावी परिवाराचे सांत्वन

सुशीकुमार शिन्देकडून शहीद कुणाल गोसावी परिवाराचे सांत्वन

आवाज न्यूज नेटवर्क – 

पंढरपूर – (प्रतिनिधी – नागेश सुतार) – शहीद मेजर कुणाल गोसावी यांचे स्मारक,सैनिकी शाळा उभारण्याचा मनोदय असल्याच्या भावना अनेकांनी व्यक्त केल्या त्यांच्या नावाने उभारण्यात येणाऱ्या सैनिकी स्कूलसाठी केंद्रात व राज्यात माझ्या परीने जे काही सहकार्य लागेल ती आपण जरूर करणार असल्याचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीकुमार शिंदे यांनी सपत्नीक शहीद कुणाल गोसावी यांच्या निवासस्थानी कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी आले होते शहीद कुणाल गोसावी यांच्या निवासस्थानी वडील मुन्नागीर आणि आई वृंदा गोसावी यांचे सांत्वन केले उज्ज्वला ताईना गहिवरून आले होते तुमच्या कुटुंबीयावर एवढा मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आपल्या नातीला सैन्यात अधिकारी बनवण्याचे स्वप्न उराशी बाळगून खर्या अर्थाने आपण देशावरील प्रेम व्यक्त करीत आहात अशा शब्दात त्यांनी आपल्या अश्रुना वाट मोकळी करून दिली शिंदे दाम्पत्याने शहीद मेजर कुणाल गोसावी यांच्या प्रतिमेस पुष्प हार अर्पण केले वीर पत्नी उमा व मुलगी उमंग यांच्याशी बोलून आपल्या दुखात सहभागी असल्याची भावना व्यक्त केली

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *