facebook
Friday , May 26 2017
Breaking News
Home / Featured / स्वातंत्र्यसैनिक कॉलनीला धूळयातना

स्वातंत्र्यसैनिक कॉलनीला धूळयातना

आवाज न्यूज नेटवर्क –

औरंगाबाद – जिल्हा परिषदेच्या मैदानावर भरिवण्यात आलेल्या फटाका बाजारला आग लागून महिना उलटला. अद्यापही मैदानावरील राख उचलण्यात आलेली नाही. या राखेचा स्वातंत्र्यसैनिक कॉलनीतील रहिवाशांना सहन करावा लागत आहे. धुळीमुळे आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे.
शहरातील महत्त्वाच्या फटका बाजारला २९ ऑक्टोबर रोजी आग लागली. फटाका बाजार आगीने काही तासांत भस्मसात झाला. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून येथून हा फटाका बाजार हलविण्यात यावा, यासाठी स्वातंत्रसैनिकांचा लढा पुन्हा समोर आला होता. त्यात आता आगीची घटना होऊन महिना उलटला. त्यानंतर आता तेथील राख पूर्णपणे साफ करण्यात आलेली नाही. राखेची धूळ हवेत मिळसते आहे. त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रशासनाने या प्रश्नाकडे तातडीने लक्ष द्यावे, असी मागणी स्वातंत्रसैनिक सहकारी गृहनिर्माण संस्थेने केली आहे. महापालिकेलाही याबाबत निवेदन दिले आहे. जिल्हा परिषद मैदानावरील २४० दुकाने आगीत भस्मसात झाली. जळालेल्या दुकानाचे पंचनामे करण्यात आले, मात्र फटाक्यांची राख, कचरा अद्याप उचलण्यात आलेला नाही. ही राख आता नगारिकांना त्रासदायक होत असून, मैदानाला कचराकुंडीचे स्वरूप आले आहे. मैदानावरून जाता-येता उडणारी धूळ परिसरातील नागरिकांसाठी त्रासदायक ठरते आहे; तसेच परिसरातील घरांमध्येही धुळीचे कण पसरत आहेत. नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून यावर तातडीने उपाययोजना करावी, नागरिकांचे आरोग्याची काळजी घ्यावी, असे रहिवाशांनी निवेदनात म्हटले आहेत. निवेदानावर अध्यक्ष अशोत मतसागर, चिटणीस अनिरुद्ध कुलकर्णी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *