facebook
Friday , May 26 2017
Breaking News
Home / औरंगाबाद / कन्नड नगर परिषद; आक्षेप कोर्टाने फेटाळला

कन्नड नगर परिषद; आक्षेप कोर्टाने फेटाळला

कन्नड नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १० मधून अब्दुल जावेद अब्दुल वाहेद यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. त्यांनी बनावट प्रमाणपत्र दाखल केल्याचा आक्षेप अहमद अली महदम अली यांनी घेतला. तो आक्षेप निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमंत हटकर यांनी फेटाळला. या निर्णयाला जिल्हा व सत्र न्यायालयात आव्हान दिले असता, जिल्हा व सत्र न्यायाधीश एस जी. शेटे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय कायम ठेवल्यामुळे अब्दुल जावेद यांचा निवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
कन्नड नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक १० मधून अब्दुल जावेद अब्दुल वाहेद यांनी दोन नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. दरम्यान, अहमद अली यांनी अब्दुल जावेदच्या नामनिर्देशन अर्जावर अक्षेप घेतला. त्यांच्या घरी शौचालय नसल्यामुळे त्याचा नामनिर्देशन पत्र रद्द करण्यात यावा, असा अर्ज दाखल केला होता. या अर्जावर निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमंत हटकर यांच्या समोर सुनावणी होऊन कन्नड नगर परिषदेने शौचालय असल्याचे दिलेले प्रमाणपत्र बरोबर आहे; अब्दुल जावेद यांच्या घरी शौचालय असल्याचा पुरावा समोर असल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी हटकर यांनी तो अक्षेप अर्ज फेटाळला. या निर्णयाविरुद्ध अहमद अली यांनी जिल्हा कोर्टात अपील दाखल केले. या अपिलावर सुनावणी होऊन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय कायम ठेवत कोर्टाने अपील फेटाळल्याने अब्दुल जावेद यांचा निवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कन्नड नगर परिषद आणि निवडणूक विभागाच्या वतीने मुख्य लोकअभियोक्ता शिवाजी नवले यांनी काम पाहिले.

Check Also

गोवंश हत्याबंदीला सुप्रीम कोर्टात आव्हान

गोवंश हत्याबंदी दुरुस्ती कायदा रद्द करण्याबाबतची जनहित याचिका मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळली होती. या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *