facebook
Thursday , May 25 2017
Breaking News
Home / मुंबई / दिलीप कुमार आजारी, लीलावतीत दाखल

दिलीप कुमार आजारी, लीलावतीत दाखल

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती पुन्हा खालावली असून त्यांना मंगळवारी सकाळी लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्या विविध चाचण्या करून डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केल्याचं कळतं.

येत्या ११ डिसेंबरला दिलीप कुमार यांचा ९४वा वाढदिवस आहे. गेल्या काही वर्षांपासून, वयोमानानुसार त्यांच्या प्रकृतीत चढ-उतार होत आहेत. एप्रिलमध्ये त्यांना सर्दी, ताप आणि श्वसनाचा त्रास झाला होता. त्यांची तब्येत नाजूक होती. परंतु, उपचारांनंतर त्यांना घरी सोडण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती हळूहळू सुधारतही होती.

परंतु, काल सकाळी अचानक दिलीप कुमार यांच्या उजव्या पायाला सूज आली. त्यामुळे त्यांच्या पत्नी सायरा बानू यांनी त्यांना लगेचच लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. त्यांच्या प्रकृतीबाबत हॉस्पिटलकडून काहीच माहिती मिळालेली नाही.

Check Also

१० कोटी मुलींचा विवाह १८ वर्षांआधीच

देशातील आरोग्याची स्थ‌तिी चिंताजनक असून, देशात दरवर्षी सुमारे १० कोटी ३० लाख मुलींचा विवाह त्यांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *