facebook
Friday , May 26 2017
Breaking News
Home / जळगाव / बजरंग बोगदा विस्तारणार

बजरंग बोगदा विस्तारणार

जळगावातील बजरंग बोगद्याची दुरवस्था झाल्याने त्याठिकाणी दोन नवीन बोगदे करण्याच्या कामास लवकरच सुरुवात होणार आहे. यासाठी रेल्वेने राबविलेली निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. येत्या आठ दिवसांत संबंधित मक्तेदाराला या बोगद्याचे कार्यादेश मिळून कामाचा श्रीगणेशा होणार आहे. गणेश कॉलनी परिसरातील या बोगद्यातून नेहमी वाहतूक करणाऱ्या जवळपास ४,५०० वाहनधारकांसह रेल्वे रुळापलिकडील लाखो जळगावकरांना यामुळे दिलासा मिळणार आहे.

जळगाव शहरातील रेल्वेमार्गावर असलेला बजरंग बोगदा हा परिसरातील प्रेम नगर, एसएमआयटी कॉलेज, मुक्ताईनगर परिसर, पिंप्राळा व इतर भाग जोडण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. हा बोगदा जुना असल्याने तो मोडकळीस आला असून त्यात सतत सांडपाणी वाहत असल्याने या बोगद्यातून जाताना नागरिकांना चांगलीच कसरत करावी लागते. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रश्न आता मार्गी लागणार असल्याने असंख्य जळगावकरांना समाधान मिळणार आहे.

निविदा प्रक्रिया कशी?

या बजरंग बोगद्यासाठी सुरुवातीला २ कोटी ९८ लाख रुपये असलेली कामासाठीची रक्कम आता ३ कोटी ७५ लाख रुपये करण्यात आली आहे. महापालिकेकडील तापी प्रीस्टेट व अन्य एका कंपनीची अनामत रक्कम अशी सुमारे ३ कोटी ७० लाख रुपये निधी आता रेल्वेकडे वर्ग करण्यात आला. या निधीतून या ठिकाणी दोन नवीन बोगदे बांधण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानुसार आता संबंधित मक्तेदारास कार्यादेश दिल्यानंतर या कामाची प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे.

वाहनचालकांचा फेरा वाचणार

या बोगद्यांची रुंदी कमी असल्याचे सध्याला या ठिकाणाहून वाहतुकीस खूप अडथळा येतो. तसेच मोठी अवजड वाहने आणि चारचाकी वाहने यांना पिंप्राळा रेल्वे गेटकडून फेऱ्यात जावे लागते. अनेकदा लहान दुचाकी वाहनांनाही ट्रॅफिक असल्याने रेल्वे गेटकडूनच जावे लागते. आता मात्र हा प्रश्न सुटणार आहे. तसेच अनेकांचा फेराही वाचणार असून या बोगद्याखालून दुचाकी वाहनांसह रिक्षा, चारचाकी हलकी वाहने देखील जाऊ शकणार आहेत. त्यामुळे पिंप्राळा रेल्वे गेटवरील ताणही आता कमी होणार आहे.

Check Also

एकच पर्व, बहुजन सर्व!

‘एकच पर्व बहुजन सर्व’ चा नारा देत बहुजन समाजाच्या विविध मागण्यांसाठी हजारोंच्या संख्येने बहुजन बांधवांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *