facebook
Tuesday , March 28 2017
Breaking News
Home / Featured / गोरेगावातील नाट्यगृहाला प्रभाकर पणशीकर यांचे नाव

गोरेगावातील नाट्यगृहाला प्रभाकर पणशीकर यांचे नाव

आवाज न्यूज नेटवर्क –

मुंबई – गोरेगाव पश्चिम येथील टोपीवाला मंडईच्या पुनर्विकासानंतर उभारण्यात येणाऱ्या इमारतीत नाट्यगृह बांधण्यात येणार असून या नाट्यगृहास अभिनेते, नाट्यनिर्माते प्रभाकर पणशीकर यांचे नाव देण्याचा प्रस्ताव शिवसेनेने गटनेत्यांच्या बैठकीत मांडला आहे.

टोपीवाला मंडईच्या ४ हजार ४०१ चौ.मी. क्षेत्रफळाचा पुनर्विकास करण्यात येणार असून या पुनर्विकासांतर्गत १६ मजली इमारत बांधण्यात येणार आहे. १६ मजल्यांपैकी चौथ्या मजल्यापासून सहाव्या मजल्यापर्यंत नाट्यगृह असणार आहे. या वातानूकुलित नाट्यगृहामध्ये ८६७ आसने असतील.

या नाट्यगृहास प्रभाकर पणशीकर यांचे नाव देण्याची मागणी शिवसेनेचे गोरेगावातील नगरसेवक राजू पाध्ये यांनी गटनेत्यांच्या बैठकीत एका प्रस्तावाद्वारे केली आहे. नाट्यक्षेत्रात पणशीकर यांचे मोठे योगदान असून त्यांचे नाव नाट्यगृहास देऊन त्यांच्या स्मृती जपण्याचे आवाहन पाध्ये यांनी केले आहे.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *