facebook
Sunday , March 26 2017
Breaking News
Home / जळगाव / ‘एम.जे.’मध्ये तरुणाईचा कलाविष्कार

‘एम.जे.’मध्ये तरुणाईचा कलाविष्कार

स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात युवा स्पंदन वार्षिक स्नेहसंमेलनाला जल्लोषात सुरुवात झाली. केसीई सोसायटीचे उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश पाटील यांच्या हस्ते उद््घाटन करण्यात आले. स्नेहसंमेलनात तरुणाईने विविध कलाविष्कार सादर केले.

प्राचार्य डॉ. उदय कुलकर्णी, डॉ. आर. टी. महाजन, डॉ. कल्पना नंदनवार, डॉ. प्रज्ञा जंगले, प्रा. पी. डी. भोळे, प्रा. एस. ओ. उभाळे, यु. व्ही. पाटील, डॉ. सी. पी. लभाणे, प्रा. आर. बी. ठाकरे, प्रा. प्रसाद देसाई, प्रा. पी. बी. चौधरी आदी उपस्थित होते. हस्तकला प्रदर्शनात ४० विद्यार्थ्यांनी स्वहस्ते बनविलेल्या विविध वस्तू मांडण्यात आल्या होत्या. यश पाटील या विद्यार्थ्याने बनविलेला पर्यावरणपूरक आकाश कंदील होता. रेवती निकम व निलांबरी जावळे यांनी संग्रहित केलेली विविध देशांमधील पोस्टाची तिकिटे व नाणी या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण होते. जयना पंचमिया या विद्यार्थिनीने टाकावू वस्तुंपासून नक्षीदार आरती थाळी बनविलेली होती. मनीष पाटील याने पक्षी तज्ज्ञ सलीम अली यांचे, तर मयुरी सोलस हिने लॅार्ड बुद्ध यांचे काढलेले स्केच लक्ष वेधून घेत होते. सिद्धी पाटील हिने काढलेली चित्रे याचेही आकर्षण होते. अंकिता चव्हाण हिच्या हॅपिनेस इन कॅलॅमिटीज या चित्राने सर्वांना अंतर्मुख केले.

Check Also

एकच पर्व, बहुजन सर्व!

‘एकच पर्व बहुजन सर्व’ चा नारा देत बहुजन समाजाच्या विविध मागण्यांसाठी हजारोंच्या संख्येने बहुजन बांधवांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *