facebook
Friday , May 26 2017
Breaking News
Home / नागपूर / परीक्षेनंतर तीस ‌दिवसांत निकाल लागणार

परीक्षेनंतर तीस ‌दिवसांत निकाल लागणार

विद्यापीठाच्या प‌रीक्षा सध्या केव्हाही जाहीर केल्या जातात. त्यांचे निकालही वेळेवर लागत नाहीत. परंतु, यापुढे परीक्षेचा शेवटचा पेपर संपल्याच्या तारखेपासून ३० दिवसांत परीक्षेचा निकाल जाहीर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक गुरुवारी विधानसभेच्या दोन्ही सभागृहांमध्ये एकमताने संमत करण्यात आले असून त्यात ही महत्त्वपूर्ण शिफारस आहे.

काही अभ्यासक्रमांसाठी निकाल जाहीर करण्याचे दिवस ४५ असतील. परीक्षांचे वेळापत्रक दरवर्षी वर्षाच्या सुरुवातीला जाहीर करावे लागेल. तसे न केल्यास त्याबाबत विद्यापीठाच्या कुलपतींकडे खुलासा करावा लागेल. परीक्षांची वेळ, तारीख आणि प्रॅक्ट‌किल परीक्षा हे आधीच ठरले पाहिजे, असे बंधन विद्यापीठांना घालण्यात आले आहे.

विद्यापीठांमधील सुधारणांसंदर्भात विधिमंडळाच्या २१ सदस्यीय संयुक्त समितीने केलेल्या शिफारशी आणि दुरुस्त्यांचा अहवाल विधानसभेत मांडण्यात आला होता. समितीने ५६ शिफारशी आणि सूचना केल्या होत्या. या सर्व शिफारशी सरकारने स्वीकारल्या आहेत. या विधेयकामुळे राज्याच्या उच्च शिक्षणाला अधिक गती मि‍‍ळेल व संपूर्ण देशात महाराष्ट्र अग्रेसर राज्य म्हणून ओळख निर्माण करेल, असा विश्वास विनोद तावडे यांनी यावेळी व्यक्त केला.

राज्य शासनाने डॉ. अनिल काकोडकर समिती, डॉ. अरुण निगवेकर समिती व डॉ. राम ताकवले समिती या तीन समित्या उच्चशिक्षण विषयक शिफरसी करण्याकरीता २०१०-११ मध्ये नियुक्त केल्या होत्या. या तीनही समित्यांनी परस्परपूरक काम केले असून उचित शिफारसी केल्या आहेत.

विधेयकातील अन्य शिफारसी…

शैक्ष‌णिक शुल्क क‌िंवा अन्य शुल्क किती असले पाहिजे ते निश्चित करणारी एक समिती नेमण्यात येईल. सेवानिवृत्त कुलगुरू किंवा शिक्षणतज्ज्ञ या समितीचे प्रमुख असतील.
कोणत्याही शाखेचा विद्यार्थी यापुढे कोणत्या शाखेतील आपल्या पसंतीचा विषय निवडू शकतो. ही तरतूद विद्यापीठाच्या कायद्यात करण्यात आली आहे.
बदलत्या जगाबरोबर अभ्यासक्रमातही तसे बदल व्हावेत यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण व विकास आयोग स्थापन करण्यात येणार आहे. या आयोगात शिक्षणमंत्री हे उपाध्यक्ष असतील. अन्य मंत्री आणि आमदार, शिक्षणतज्ज्ञ यांचा समावेश असेल.
विद्यापीठांनी पाच वर्षांचा अभ्यासक्रम तसेच अन्य बाबींचा आराखडा तयार करावा, त्याला हा आयोग मंजुरी देईल. अशीही नव्या कायद्यात तरतूद केली आहे.

विद्यार्थी संघटना म्हणतात…

निर्णयाचे स्वागत

नवीन महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक २०१६चे स्वागत. याबाबत कॉलेज आणि विद्यार्थ्यांना अधिक स्पष्टपणे कळविण्यात आले पाहिजे.

– अनिकेत ओव्हाळ, अभाविप

येत्या वर्षात फायदा व्हावा

निवडणुकासाठी आचारसंहिता आवश्यक आहे. रखडलेल्या कामांना आता गती मिळेल. सहा महिन्यात कायदा लागू करण्यात यावा. जेणेकरून येत्या वर्षात त्याचा फायदा होईल.

– सुधाकर तांबोळी, मनविसे

विद्यार्थी चळवळीसाठी सोनेरी दिवस

सरकारच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. कॉलेजजीवनातच विद्यार्थ्यांना अन्यायाविरोधात संघर्षाचे धडे मिळतात, त्यातूनच नेते घडतात. विद्यार्थी चळवळीसाठी आजचा सोनेरी दिवस आहे.

– अ‍ॅड. अमोल मातेले, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस

बदलाची आशा

आता सर्व विद्यापीठांमध्ये सिनेट सदस्यांच्या तसेच कॉलेजांमध्ये निवडणुका सुरू होणार असल्यामुळे उच्च शिक्षण क्षेत्रात बदलाची आशा निर्माण झाली आहे.

– प्रदीप सावंत, युवा सेना

Check Also

अबब! कोल्ड्रींकवर ६६ टक्के अधिक शुल्क

रेफ्रीजरेटरमध्ये ठेवण्यात येणाऱ्या बहुतांश डबाबंद पदार्थांवर अतिरिक्त शुल्क घेण्याचा अनधिकृत पायंडा अनेकांनी घातला आहे. पण, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *