facebook
Tuesday , January 24 2017
Breaking News
Home / Featured / इंटेरिअर डिझायनर्ससाठी आता लायसन्स!

इंटेरिअर डिझायनर्ससाठी आता लायसन्स!

आवाज न्यूज नेटवर्क –

नाशिक – इंटेरिअर डिझायनिंगचे काम करणाऱ्यांना लवकरच कायद्याचे संरक्षण प्राप्त होणार आहे. त्यामुळे आर्किटेक्टप्रमाणेच इंटेरिअर डिझायनर्स व्यवसायासाठी लायसन आवश्यक होणार आहे. या कायद्याचा मसुदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन इंटेरिअर डिझायनर्स (ट्रीपल आयडी) ने तयार केला असून, तो लवकरच केंद्र सरकारला सादर केला जाणार आहे.

आर्किटेक्टप्रमाणेच इंटेरिअर डिझायनर्स विशिष्ट प्रकारचे शिक्षण घेऊन व्यवसाय सुरू करतात. मात्र, फर्निचर विक्रेत्यापासून तर घराचे किरकोळ काम करणाऱ्यांपर्यंत सारेच जण आम्ही इंटेरिअर डिझायनर्स असल्याचे सांगतात. त्यामुळे ग्राहकांची दिशाभूल आणि आर्थिक फसवणूक तर होतेच शिवाय ग्राहकाच्या समाधानासारखे काम होतेच असे नाही. तसेच, योग्य शिक्षण घेतलेले असूनही ग्राहक इंटेरिअर डिझायनर्सकडे येत नाहीत. या साऱ्या प्रकारामुळे इंटेरिअर डिझाइन या क्षेत्रालाही मोठी बाधा पोहोचत आहे. देशभरात आजघडीला १० हजाराहून अधिक इंटेरिअर डिझायनर्स कार्यरत आहेत. तर, येत्या काळात हजारोच्या संख्येने नवीन इंटेरिअर डिझायनर्स या क्षेत्रात येऊ घातले आहेत. या साऱ्या प्रकाराची दखल ट्रीपलआयडीने घेतली आहे. आर्किटेक्टचा व्यवसाय करण्यासाठी ज्या पद्धतीने आर्किटेक्ट कौन्सिलची परवानगी लागते. त्याच धरतीवर इंटेरिअर डिझायनर्सलाही परवानगी मिळावी आणि त्यासाठीचा स्वतंत्र कायदाच भारतात व्हावा यासाठी ट्रीपलआयडी आग्रही आहे. विविध तज्ज्ञ आणि अभ्यासकांच्या मदतीने या कायद्यासाठीचा मसुदा ट्रीपलआयडीने तयार केला आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि पंतप्रधान कार्यालय या दोन्ही विभागांची भेट यासंदर्भात घेण्यात येणार आहे. या कायद्याचा मसुदा ट्रीपलआयडीच्यावतीने सादर या दोन्ही ठिकाणी सादर केला जाणार आहे. भारतीय संविधानात तरतूद करून या व्यवसायाला कायदेशीर स्वरूप प्राप्त करून देण्याचा हा प्रयत्न येत्या काळात नागरिकांची जीवनशैली बदलण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यासाठी आम्ही सज्ज आहोत, असा विश्वास ट्रीपलआयडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रताप पाटील यांनी व्यक्त केला आहे.

आर्किटेक्टप्र्रमाणेच इंटेरिअर डिझायनरला व्यवसाय करता आला पाहिजे. यासाठीच आम्ही कायद्याचा मसुदा तयार केला आहे. तो आम्ही केंद्र सरकारला सादर करणार आहोत. त्यामुळे या क्षेत्राला महत्त्व प्राप्त होतानाच अधिकृत, शास्त्रोक्त आणि सर्वसामान्यांना त्यांच्या मनासारखे इंटेरिअर करून घेता येऊ शकेल.

– प्रताप पाटील, अध्यक्ष, ट्रीपल आयडी

Check Also

विकास कामे झाली, पण ठराविक लॉबीचीच झाली – यशवंत भोसले

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *