facebook
Sunday , March 26 2017
Breaking News
Home / Featured / पदवीधर नावनोंदणीला मुदतवाढ

पदवीधर नावनोंदणीला मुदतवाढ

आवाज न्यूज नेटवर्क –

नाशिक – नाशिक पदवीधर मतदारसंघात नावनोंदणीसाठी निवडणूक आयोगाने मुदतवाढ दिली आहे. आता पदवीधर नागरिकांना १९ डिसेंबरपर्यंत यादीत नाव समाविष्ट करता येणार असून, अंतिम मतदारयादी १२ जानेवारीला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दरम्यान, या नव्या कार्यक्रमामुळे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक फेब्रुवारी महिन्यात होण्याची शक्यता आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी नव्याने याद्या तयार करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते. त्यानुसार ५ डिसेंबरला अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केली होती. मात्र, आता यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. त्याचा फायदा मतदारसंघातील नाशिकसह नगर, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांना होणार आहे.

विभागात घेतलेल्या नावनोंदणी मोहिमेत दोन लाख ४० हजारांहून अधिक मतदारांची नोंदणी करण्यात आली होती. त्यात पुरूष मतदारांची संख्या एक लाख ७० हजार ८७१, तर ६९ हजार ८६२ महिला मतदारांचा समावेश आहे. दरम्यान, कागदपत्रांची अपूर्णता तसेच अन्य तांत्रिक दोषांमुळे नाशिक जिल्ह्यातील तीन हजार ६८ अर्ज प्रशासनाने बाद ठरविले आहेत. आयोगाने जाहीर केलेल्या नवीन कार्यक्रमामुळे पदवीधर मतदारसंघासाठी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे.

…यांना करता येईल नावनोंदणी

नावनोंदणीसाठी आयोगाने मुदतवाढ दिली असली, तरीही नोंदणी प्रक्रियेत कोणताच बदल केलेला नाही. ऑगस्ट २०१३ पूर्वी पदवी-पदविका मिळविलेल्या नागरिकांना या मतदारसंघासाठी नावनोंदणी करता येईल. नोंदणी करताना नागरिकांनी १८ क्रमांकाच अर्ज भरून देणे आवश्यक आहे. त्यासोबत दोन पासपोर्ट साईज छायाचित्रांसह शाळा सोडल्याचा दाखला, मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी-पदविका, आधारकार्ड अथवा रहिवासी दाखला जोडणे आवश्यक आहे. ही सर्व कागदपत्रे राजपत्रित अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने साक्षांकित करावी लागणार आहेत.

असा आहे नवीन कार्यक्रम

१९ डिसेंबरपर्यंत नावनोंदणी, ६ जानेवारीला प्रारूप यादी प्रसिद्ध, अंतिम यादी १२ जानेवारीला तयार होईल.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *