facebook
Sunday , May 28 2017
Breaking News
Home / Featured / ‘पीएसआय’साठी वयोमर्यादा वाढणार

‘पीएसआय’साठी वयोमर्यादा वाढणार

आवाज न्यूज नेटवर्क –

पुणे – पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) पदासाठी होणाऱ्या पूर्व परीक्षेसाठी वयोमर्यादा वाढवण्याचे सूतोवाच राज्य सरकारने शुक्रवारी विधान परिषदेत केले. त्यामुळे खुल्या प्रवर्गासाठी वय २८ वर्षांवरून ३३ वर्षे, तर मागासवर्गीय प्रवर्गासाठी ३३वरून ३८ वर्षे होणार आहे. याबाबत सरकार लवकरच निर्णय घेऊन त्याबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला (एमपीएससी) आदेश देण्याची शक्यता आहे. राज्यातील हजारो उमेदवारांना यामुळे दिलासा मिळाला आहे.

वयोमर्यादावाढीचा निर्णय असतानाही ‘एमपीएससी’ने ‘पीएसआय’च्या ७५० पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करताना वयोमर्यादा २८ वर्षे ठेवण्यात आली होती. या विरोधाभासाला ‘मटा’ने वाचा फोडली होती. त्यावरून शुक्रवारी विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनजंय मुंडे आणि आमदार निरंजन डावखरे यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी, पीएसआय परीक्षेसाठी वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी २८वरून ३३, तर मागासवर्गीय प्रवर्गासाठी ३३वरून ३८ करण्याबाबत सरकार अनुकूल असल्याचे सांगितले. ‘याबाबत कायदेशीर बाजू तपासून लवकरच आदेश काढण्यात येतील, त्यामुळे उमेदवारांनी घाबरायचे कारण नाही, असे आश्वासन दिले आहे,’ अशी माहिती डावखरे यांनी ‘मटा’ला दिली. विविध विद्यार्थी संघटना आणि विद्यार्थ्यांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

वयोमर्यादा वाढावी यासाठी दोन वर्षांपासून विविध विद्यार्थी संघटना आक्रमक होत्या. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पुढाकार घेऊन विद्यार्थी संघटना व विद्यार्थ्यांची बाजू सरकारपुढे मांडली होती. ज्या परीक्षांसाठी खुल्या प्रवर्गासाठी वयोमर्यादा ३३ व मागासवर्गीयांसाठी ३८ वर्षे आहे, त्या परीक्षांमध्ये वयोमर्यादा पाच वर्षांनी वाढवण्याचा निर्णय सरकारने यंदाच्या एप्रिलमध्ये घेतला; मात्र ‘एमपीएससी’च्या इतर परीक्षांमध्ये आणि ‘पीएसआय’च्या परीक्षेमध्ये फरक असून, ‘पीएसआय’चे निकष व पात्रता वेगळ्या आहेत, असे सांगून हा नियम २८ वर्षे वयोमर्यादा असणाऱ्या पीएसआय परीक्षेला लागू होत नसल्याचे ‘एमपीएससी’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते.

…….

वयोमर्यादा वाढण्याबाबत, तसेच ‘एमपीएससी’ला कारवाई करण्यासाठी आदेश देण्याबाबत औचित्याचा मुद्दा उपस्थित केला. याबाबत लवकरच आदेश काढण्याचे आश्वासन सरकारने दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही हा मुद्दा मांडला असता त्यांनी वयोमर्यादा वाढवण्यात येईल, असे सांगितले.

– अॅड. निरंजन डावखरे, आमदार

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *