facebook
Tuesday , March 28 2017
Breaking News
Home / Featured / बालगंधर्व संगीत महोत्सव जानेवारीत

बालगंधर्व संगीत महोत्सव जानेवारीत

आवाज न्यूज नेटवर्क –

जळगाव –  स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान आयोजित पंधरावा बालगंधर्व संगीत महोत्सव ५ ते ८ जानेवारी २०१७ पर्यंत जळगावात होत असल्याची माहिती चांदोरकर प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त दीपक चांदोरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

प्रा. शरद छापेकर यांनी चार दिवसांच्या कार्यक्रमांची माहिती दिली. त्यानुसार ५ जानेवारीला प्रख्यात संवादिनी वादक पं. तुलसीदास बोरकर यांच्या एकल संवादिनी वादनाने महोत्सवाचा प्रारंभ होईल. त्यांच्या बरोबर त्यांचा शिष्य उन्मेष खरे हा बालक संवादिनी वादन करणार आहे. ६ रोजी, प्रथम सत्रात भोपाळ येथील सुप्रसिद्ध गायक उमाकांत, रमाकांत व अखिलेश गुंडेचा बंधू यांचे ध्रुपद गायन होणार होईल, तर द्वितीय सत्रात मुंबईच्या वेणुवादक भगिनी पंडिता सुचिस्मिता आचार्य व पंडिता देबप्रिया रणदिवे यांची बासरी वादनाची जुगलबंदी होईल. ७ रोजी, प्रथम सत्रात पुण्याच्या पंडिता पद्माताई तळवलकर यांचे शास्त्रीय गायन होईल, तर द्वितीय सत्रात बनारसचे सौरव व गौरव मिश्रा कथ्थक जुगलबंदी सादर करतील. ८ रोजी, प्रथम सत्रात पुण्याचे पं. जयवंत उत्पात यांच्या हॅन्डसोनिक या आगळ्यावेगळ्या पाश्चात्य वाद्याचे एकल वादन करतील. द्वितीय सत्रात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सुप्रसिद्ध व्हायोलिन वादक पं. कार्तिक अय्यर यांच्या फ्युजनने संगीत महोत्सवाची सांगता होईल. या संपूर्ण महोत्सवात तबल्याची साथ मुंबईचे पं. ओजस अडिया, पं. चारुदत्त फडके, पं. विवेक मिश्रा, पं. कालिनाथ मिश्रा व पं. मंदार पुराणिक करणार आहेत. पं. संगीत मिश्रा हे सारंगीवर साथसंगत करणार आहेत. संपूर्ण कार्यक्रमाचे निरुपण मंगला खाडीलकर करणार आहेत. रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती देऊन या बालगंधर्व संगीत महोत्सवाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन चांदोरकर प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले.

संगीत महोत्सवाचे यंदाचे पंधरावे वर्ष

बालगंधर्वांचे नावाने संपूर्ण भारतात केवळ जळगावला बालगंधर्व संगीत महोत्सवाचे स्व. वसंतराव चांदोरकर प्रतिष्ठानच्यावतीने आयोजन केले जात असून, उत्तर महाराष्ट्र व अन्य ठिकाणाहून संगीत रसिक आवर्जून या महोत्सवास उपस्थिती देत असतात. गेले १४ वर्ष सातत्याने हा संगीत महोत्सव जळगावात होत असल्याने आता तो जळगावचा सांस्कृतिक मानदंड ठरला आहे. यंदा या संगीत महोत्सवाचे पंधरावे वर्ष असून, हा महोत्सव तीनऐवजी चार दिवसांचा राहणार आहे. त्यामुळे संगीतप्रेमी अधिक चांगल्या रितीने संगीताचा आस्वाद घेऊ शकतील.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *