facebook
Sunday , May 28 2017
Breaking News
Home / Featured / मराठा आरक्षण देणारच : देवेंद्र फडणवीस

मराठा आरक्षण देणारच : देवेंद्र फडणवीस

आवाज न्यूज नेटवर्क –

नागपूर – मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी ‌विधानसभेत ठणकावून सांगितले. प्रत्येक जिल्ह्यात मराठा विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, मराठा युवकांच्या शैक्ष‌णिक व सामाजिक प्रगतीसाठी संशोधन संस्था स्थापन करण्याची घोषणाही त्यांनी केली. त्याचवेळी, मराठा समाजाला आरक्षण न मिळण्यास काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेच कसे जबाबदार आहेत, याची जंत्रीही मुख्यमंत्र्यांनी मांडली.

मराठा, धनगर, मुस्लिम यांच्या आरक्षणासंदर्भातील सत्तारुढ आण‌ि विरोधकांनी मांडलेल्या प्रस्तावावरील मॅरेथॉन चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी वरील घोषणा केल्या. मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्ष‌णिक मागासलेपणाबाबतचे शिवाजी महाराजाच्या कालखंडापासूनचे पुरावे आमच्या सरकारने जमा केले आहेत. मराठा समाजाचे सरकारी सेवेत किती प्रमाण आहे; शाळा, महाविद्यालयात या समाजाच्या विद्यार्थ्यांचे किती प्रमाण आहे, याचा गोखले संशोधन संस्थेने शास्त्रीय पध्दतीने अभ्यास करून अहवाल दिला आहे. मराठा आरक्षणासंदर्भात बाजू मांडण्यासाठी हरीश साळवे हे प्रख्यात वकील सरकारने उभे केले असून, मराठा आरक्षणासाठी सरकारने सर्व तयारी केली आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

–धनगरांनाही आरक्षण देऊ

धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्याबाबतही मी आश्वासन दिले आहे. मागील सरकार केवळ आरक्षणाबाबत बोलले. पण, या आरक्षणाच्या विरोधातील अहवाल जोडून प्रस्ताव त्यांनी दिल्लीला पाठवला. त्यामुळे तो नाकारला गेला, असा आरोप करत, ‘आम्ही मात्र पूर्ण अभ्यास करून धनगर समाजाची आरक्षणाची मागणी पूर्ण करू’, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

–मुस्लिम आरक्षणाबाबत बैठक

मुस्लिम समाजाला नोकरीत आरक्षण देण्याबाबत न्यायालयाची स्थगिती आहे. या धर्मातील मागासलेल्या जातींना याआधीच आरक्षण मिळाले आहे. धर्माच्या आधारे आरक्षण देता येत नाही, असे न्यायालयाचे म्हणणे आहे. तरीही मुस्लिम समाजाच्या मागण्यासंदर्भांत लवकरच अल्पसंख्याक समाजाच्या आमदारांची बैठक घेऊन त्यात चर्चा केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आपल्या सरकारने अल्पसंख्याकांसाठी सुरू केलेल्या अनेक योजनांची यादीही त्यांनी वाचून दाखविली.

–‘अॅट्रॉसिटी’ रद्द करणार नाहीच

अॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याचा प्रश्नच नसून, त्याच सुधारणाही करण्यात येणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. या कायद्याखाली राज्यात वर्षंभरात दोन हजारच्या आसपास गुन्हे दाखल होतात. पण, हे प्रमाण अन्य राज्यांच्या तुलनेत खूपच कमी आहे. या कायद्याचा दुरुपयोग होत असल्याच्या तक्रारी असून, यासंदर्भात विधिमंडळाच्या सदस्यांची एक समिती नेमली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. त्याचवेळी, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे खरे अनुयायी या कायद्याचा गैरवापर करणार नाहीत’, असे वक्तव्यही त्यांनी केले.

–‘कोपर्डी’ घटनेत फाशीची मागणी

कोपर्डी येथील अत्याचाराच्या घटनेतील नराधमांना फाशीची शिक्षा ‌झाली पाहिजे, अशी मागणीही राज्य सरकार कोर्टात करेल, असे मुख्यमंत्री पुढे म्हणाले.

–मराठा आरक्षणाच्या ठरावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सलग दीड तास पोटतिडकीने बोलत असताना त्यांच्यामागे बसलेले जलसंपदा मंत्री प्रा. राम शिंदे डुलक्या काढत होते. त्याचवेळी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून विरोधक किती गंभीर आहेत, तेही उघड झाले. मुख्यमंत्र्यांचे निवेदन सुरू झाले तेव्हा काँग्रेस, राष्ट्रवादीचे मोजून सहा आमदार सभागृहात हजर होते. पाच मिनिटांनंतर राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील व माजी मंत्री बाळासाहेब थोरात सभागृहात आले. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे मात्र अनुपस्थित होते.

–मंत्री शिंदे यांची डुलकी
मराठा आरक्षणाच्या ठरावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सलग दीड तास पोटतिडकीने बोलत असताना त्यांच्यामागे बसलेले जलसंपदा मंत्री प्रा. राम शिंदे डुलक्या काढत होते. त्याचवेळी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून विरोधक किती गंभीर आहेत, तेही उघड झाले. मुख्यमंत्र्यांचे निवेदन सुरू झाले तेव्हा काँग्रेस, राष्ट्रवादीचे मोजून सहा आमदार सभागृहात हजर होते. पाच मिनिटांनंतर राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील व माजी मंत्री बाळासाहेब थोरात सभागृहात आले. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे मात्र अनुपस्थित होते.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *