facebook
Friday , May 26 2017
Breaking News
Home / Featured / अधिकाऱ्याला धमकी, जानकरांविरुद्ध गुन्हा

अधिकाऱ्याला धमकी, जानकरांविरुद्ध गुन्हा

आवाज न्यूज नेटवर्क –

नागपूर – वडसा-देसाईगंज नगरपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान मर्जीतील उमेदवाराला मनासारखे निवडणूक चिन्ह मिळावे म्हणून अधिकाऱ्याला धमकावल्याप्रकरणी पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक महादेव जानकर यांच्याविरुद्ध अखेर शनिवारी रात्री वडसा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मंत्र्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासोबतच प्रभाग क्रमांक ९ ची निवडणूकदेखील रद्द करण्यात आल्याने मंगळवारपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या कामकाजात जानकरांच्या माध्यमातून सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

गडचिरोली जिल्ह्यात देसाईगंज येथील नगरपरिषद निवडणुकीतील उमेदवारास कपबशी चिन्ह देण्यात यावे आणि काँग्रेसचा अर्ज रद्द करण्यासाठी महादेव जानकर यांनी निवडणूक अधिकाऱ्यावर फोन करून दबाव आणल्याचा आरोप होता. त्यांनी निवडणूक अधिकाऱ्याला धमकावल्याचा ‘व्हिडीओ’ हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडीओ व्हायरल होताच निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस बजावून २४ तासांच्या आत उत्तर मागितले. या उत्तराचा अभ्यास केल्यानंतर आयोगाने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची सूचना निवडणूक अधिकाऱ्यास केली. त्यानुसार शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *