facebook
Tuesday , March 28 2017
Breaking News
Home / Featured / ‘आरंभ’च्या धैर्याला कौतुकाची साथ

‘आरंभ’च्या धैर्याला कौतुकाची साथ

आवाज न्यूज नेटवर्क –

औरंगाबाद – ‘मतिमंद किंवा कोणत्याही विशेष मुलांना दया, सहानुभूतीची गरज नाही. त्यांना समाजाच्या बळाची आवश्यकता आहे. दान दिले आणि आपली जबाबदारी संपली असे दाते त्यांना नको आहेत, तर या मुलांशी आपुलकीचे नाते निर्माण व्हावे असे प्रयत्न हवे,’ असे आवाहन आमदार संजय शिरसाट यांनी शनिवारी केले.
गतिमंद व स्वमग्न मुलांसाठी कार्यरत असलेल्या आरंभ ऑटिझम सेंटरचा पाचवा वर्धापन दिन यशवंतराव चव्हाण सभागृहात मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी एंड्रेस हौझरचे व्यवस्थापकीय संचालक एन. श्रीराम प्रमुख पाहुणे होते. बीडच्या शांतीवन प्रकल्पाचे अध्यक्ष दीपक नागरगोजे ए. वन. इंडस्ट्रीज व कस्तुरतन फाउंडेशनचे अध्यक्ष (पुणे) र्कीर्ती ओस्तवाल, मिलिंद कंक, चेतन पाटील, सेंटरच्या संचालिका अंबिका टाकळकर उपस्थित होत्या. पाहुण्यांच्या हस्ते द्वीपप्रज्वलन झाल्यावर ‘देवा श्री गणेशा…’ या गाण्यावर गणेशवंदना सादर झाली. यानंतर श्रीकृष्ण लीलांवरच्या ‘दशावतार’ या प्रसंगावर आधारित समूहनृत्याने उपस्थितांची दाद मिळवली. भक्ती कुलकर्णीने ‘इतनी शक्ती हमे दे अन्नदाता…’ हे गाणे सादर केले. ब्लेझ अॅकॅडमीचे नृत्य प्रशिक्षक चेतन पाटील, आकाश गंगावणे, विवेक बावस्कर, वृषाली पतंगे यांनी मुलांना मदत केली. यानंतर ‘आज गोकुळात रंग खेळतो हरी..’ हे गाणे स्पर्शून गेले. नीरज नवनीलच्या ‘गोविंदा आला रे…’ गाण्याने धमाल उडवली.
सर्वच मुलांचा सहभाग असलेल्या फॅशन शोने रंगत आणली. विविध वेशभूषेतील मुलांनी सर्वांचे लक्ष वेधले. शिक्षिका सुकन्या देशपांडे, स्वाती शहापूरकर यांच्यासह पालकांनी ‘छोटी छोटी गय्या रे…’ ‘खेळ मांडला..’ ही गाणी गायली. मैत्री कशी होती व कशी निभावली जाते यावर आधारित नाटकाद्वारे मैत्रीचा संदेश देताना वातावरण भावूक झाले. मंदार देसाई यांनी ढोलकी, अमर लाटकर यांनी तबला व पियानोवर अरविंद कुमार यांनी साथ दिली. आरंभच्या शिक्षिकांनी तयार केलेली संस्थेची पाच वर्षांची सफर दाखवणारी डाँक्युमेंट्री पाहून सर्व भावूक झाले. यावेळी आरंभचे अध्यक्ष बाळासाहेब टाकळकर यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. वैशाली सुतावण व मिलिंद दामोधरे यांनी सूत्रसंचालन केले. अंबिका टाकळकर यांनी आभार मानले. अंजली कुलकर्णी, ललिता खापरे, ऋतुजा काटकर, विलास शिंगी यांनी परिश्रम घेतले.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *