facebook
Friday , May 26 2017
Breaking News
Home / Featured / दोन हजारच्या सुट्यांसाठी धावपळ

दोन हजारच्या सुट्यांसाठी धावपळ

आवाज न्यूज नेटवर्क –

कोल्हापूर – सलग तीन दिवस बँका बंद राहणार असल्याने आज, शनिवारी दिवसभर बँकांच्या एटीएमबाहेर रांगा दिसत होत्या. दैनंदिन किरकोळ व्यवहारांसाठी पैसे लागणार असल्याने एटीएममधून दोन हजारांची नोट येत असली, तरी ती घेऊन त्यांचे सुटे करून घेण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू होती. एसबीआय वगळता इतर बहुतांश बँकांची एटीएम सेंटर दिवसभर बंद राहिल्याने अनेकांच्या पदरी निराशा पडली.

चलनातून पाचशे आणि हजारच्या नोटा रद्दच्या घेतलेल्या निर्णयाचे पडसाद सलग सुट्यांमुळे आज, शनिवारी सर्वाधिक जाणवले. शहरात एटीएम सेंटरवर सकाळपासूनच गर्दी होती. मात्र, काही बँकांच्या सेंटरवर नोटा मर्यादित पैसे असल्याने दुपारपर्यंत तेथील सुविधा बंद झाली. शहरातील एसबीआयच्या एटीएम सेंटवर मात्र, सर्वत्र मोठ्या रांगा होत्या. दसरा चौक, आदित्य कॉर्नर, राजारामपुरी, पार्वती थिएटरसमोरील पेट्रोलपंप, उमा टॉकीजसमोरील पेट्रोलपंप, लक्ष्मीपुरीतील एसबीआयच्या सेंटरवर रांगा होत्या. आदित्य कॉर्नरसह काही एटीएम दुपारीनंतर बंद असल्याचे दिसले. पण, दसरा चौक, खानविलकर पेट्रोलपंप येथील एटीएमवर सायंकाळीही नागरिकांची रांग दिसत होती. एसबीआय वगळता इतरत्र बँकांच्या वेंडर कंपन्यांकडून एटीएमवर कॅशच उपलब्ध न झाल्यामुळे शहरातील त्यांच्या सर्व एटीएमवर खडखडाट होता. दुपारनंतर जवळपास शहरातील ९० टक्के एटीएम बंद होती. सायंकाळी लक्ष्मीपुरीत दोन खासगी बँकांच्या एटीएमवर किरकोळ गर्दी होती.

शहरात सुरू असलेल्या एटीएमवर दोन हजार रुपयांची एकच नोट मिळत असल्याने तीन मिळाल्यानंतर त्याचे सुटे करून घेण्यासाठी नागरिकांना धावपळ करावी लागत होती. काहींनी पेट्रोलपंपांवर पेट्रोल भरून किंवा केमिस्ट आणि इतर दुकानांमध्ये किरकोळ आवश्यक साहित्याची खरेदी करून पैसे सुटे करून घेतले. पेट्रोलपंपांवरही पैसे सुटे मिळूपर्यंत अनेकांना थांबावे लागले.

एटीएम आज सुरू राहणार

एसबीआयसह काही खासगी बँकांनी उद्या (रविवार, ११ डिसेंबर) एटीएम सेंटर सुरू ठेवण्याची तयारी केल्याची माहिती बँकांच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे उद्या सकाळच्या टप्प्यात काही एटीएम सेंटर सुरू राहणार आहे. पण, कॅश संपल्यानंतर मात्र, ती पुन्हा बंद राहण्याची शक्यता आहे.

मंगळवारीच पुन्हा व्यवहार

महिन्यातील दुसरा शनिवार, रविवारीच साप्ताहिक सुटी आणि त्याला जोडून आलेल्या इद-ए-मिलादच्या सार्वजनिक सुटीमुळे तीन दिवस बँका बंद आहेत. त्यामुळे सामान्यांसाठी एटीएम सेंटर हाच एकमेव आधार होता. आता मंगळवार (१३ डिसेंबर) बँका सुरू झाल्यानंतरच व्यवहार पुन्हा हळूहळू पूर्वपदावर येण्याची शक्यता आहे. तोपर्यंत ज्या एटीएममध्ये पैसे तेथे रांगा, असे अजून दोन दिवस दिसणार आहे.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *