facebook
Friday , May 26 2017
Breaking News
Home / Featured / पत्नीला भोसकणाऱ्या पतीला अपघात

पत्नीला भोसकणाऱ्या पतीला अपघात

आवाज न्यूज नेटवर्क –

जळगाव – कौंटुबिक वादातून पत्नीवर चाकूने वार करून त्यानंतर कार घेऊन निघालेल्या मद्यधुंद तरुणाने पिंप्राळा रस्त्याच्या बाजूला असलेल्या वीज खांबाला जोरदार धडक दिली. या अपघातात हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली.

पिंप्राळा येथील रहिवासी किरण राजेंद्र भावसार (वय ३३) यांचा शुक्रवारी रात्री पत्नी तेजश्रीबरोबर जोरदार वाद झाला. यावेळी त्यांनी मद्याच्या नशेत तेजश्रीवर चाकूने वार केला. मद्याच्या धुंदीत किरण भावसार कार (एमएच १९ एई ०४०५) घेऊन जळगाव शहराकडे निघाला. घरापासून काही अंतरावर असलेल्या पिंप्राळा रोडवरील सिल्क मिल समोरील मोकळ्या मैदानात असलेल्या वीज खांबाला त्यांनी जोरदार धडक दिली. या घटनेत कारचा उजवीकडील भाग चक्काचूर झाला. खांबदेखील वाकला. किरण भावसार फुटलेल्या काचमधून बाहेर आला. त्यानंतर वीज तार ओलांडून गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर आला.

मध्यरात्री पोलिस कर्मचारी राजेश मेढे व नाना तायडे हे बजरंग पुलाजवळील बँक ऑफ इंडियाजवळ गस्तीवर होते. त्यांना काही जणांनी एक तरुण रक्तबंबाळ स्थितीत रस्त्यावर पडला असल्याची माहिती दिली. त्यांनी जखमी किरण याला रिक्षाने रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, किरण यांनी पत्नी तेजश्री हिच्यावर चाकूने वार करून तिच्या पायाला दुखापत केली होती. या प्रकरणी तेजश्री यांनी रात्रीच रामानंद पोलिस स्टेशन गाठून त्यांच्याकडे माहिती दिली. त्या जखमी असल्याने त्यांना वैद्यकीय उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलला पाठविण्यात आले. त्यांनी पती किरण याच्याविरूद्ध तक्रार दिली आहे.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *