facebook
Wednesday , May 24 2017
Breaking News
Home / Featured / पैशांवर माज करणाऱ्यांचे दिवस संपले

पैशांवर माज करणाऱ्यांचे दिवस संपले

आवाज न्यूज नेटवर्क –

पुणे – ‘राज्यकर्तेच ठेकेदार बनल्याने नगरपालिका म्हणजे भ्रष्टाचाराचे अड्डे झाले आहेत. मात्र, आता सरकारने तेथील कामाचे ऑडिट करण्यासाठी त्रयस्थ यंत्रणा नेमली आहे. जनतेच्या पैशावर माज करणाऱ्यांचे दिवस संपले आहेत. आम्हाला जनतेच्या तिजोऱ्या भरायच्या आहेत नेत्यांच्या नाहीत,’ असा हल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीतील प्रचारसभेत शनिवारी चढविला.

फडणवीस यांनी जिल्ह्यात बारामती, लोणावळा, तळेगाव दाभाडे, आळंदी आणि शिरूरमध्ये प्रचारसभा घेतल्या. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अमर साबळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार बाळा भेगडे, योगेश टिळेकर आदी या वेळी उपस्थित होते. ‘बारामती धनदांडग्याची नाही, ती गरिबांची, शेतकऱ्यांची आणि शेतमजुरांची आहे. राज्यातील नगरपालिका निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील निकाल म्हणजे परिवर्तनाची नांदी आहे. हे परिवर्तन यंदा बारामतीतही दिसेल,’ असेही फडणवीस यांनी सांगितले. ‘बारामतीकरांनी सत्तापरिवर्तन केल्यास राज्याची तिजोरी बारामती शहराच्या विकासासाठी खुली राहिल, अशी ग्वाही देऊन काळ्या पैसा, भ्रष्टाचारविरुद्धच्या लढाईत बारामतीकरांची साथ हवी आहे,’ असे आवाहन त्यांनी केले.

मोदींचे सैनिक बनून काही दिवस त्रास सोसा

‘नोटाबंदीवरून तोंड काळे झालेल्या काळ्या पैसेवाल्यांची ओरड सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सैनिक बनून काही दिवस त्रास सहन करा, त्यानंतर आर्थिक गुलामगिरीतून कायमचे मुक्त होऊ,’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी प्रचारसभेत केले.
महाराष्ट्र गावांप्रमाणेच शहरातही विस्तारलेला आहे. मागील सरकारने शहरांकडे दुर्लक्ष केले कसल्याही प्रकारचे नगर नियोजन केले नाही. स्वातंत्र्यानंतरही आपण अन्न, वस्त्र, निवारा अशा मूलभूत गरजा देऊ शकत नसेल तर काय उपयोग अशी टिप्पणी त्यांनी मागील सरकारवर केली.

विजयाची सुरुवात तळेगावातून

‘पुणे जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाची विजयी सुरुवात तळेगाव दाभाडेने केली आहे. त्यामुळे या नगरपालिकेला पैशांची कमतरता पडू देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तळेगावदाभाडे येथे दिली. तळेगावदाभाडे प्रमाणे सर्वत्र भाजपची घौडदौड कायम राहिल. सरकारने दिलेला निधी पारदर्शीपणे खर्च झाला पाहिजे. त्यासाठी पूर्णपणे पारदर्शी ई-टेंडर निघाले पाहिजे आणि म्हणून नगरपालिका पारदर्शी गतीशील व गुणवत्तापूर्ण असल्या पाहिजे,’ असे मत फडणवीस यांनी व्यक्त केले.

नगरपालिकांमध्येही ई-टेंडरिंग झाले पाहिजे. त्यामुळे तेथेही कारभार पारदर्शी पद्धतीने चालेल आणि सरकारचा पैसाही मार्गी लागेल.
– देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *