facebook
Sunday , March 26 2017
Breaking News
Home / Featured / विक्रेत्यांचा मनपा पथकाबरोबर वाद

विक्रेत्यांचा मनपा पथकाबरोबर वाद

आवाज न्यूज नेटवर्क  –
जळगाव – रेल्वे स्टेशन रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या हातगाड्या जप्त केल्याने संतप्त झालेल्या विक्रेत्यांनी महापालिका इमारतीत येऊन अतिक्रमण निर्मूलनच्या पथकाशी जोरदार वाद घातला. विक्रेते आणि मनपा कर्मचारी यांच्यात बाचाबाची झाल्याने काही वेळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.

महापालिका अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधीक्षक एच. एम. खान यांच्या मागदर्शनाखाली शनिवारी अतिक्रमणाविरोधात मोहीम सुरू होती. सकाळी मनपा पथकाने नवीन बसस्थानकासमोरील विक्रेत्यांना हटविले. तेथील रस्त्यावर ठेवलेले बाक व स्टँड पथकाने जप्त केले. त्यानंतर पथकाने आपला मोर्चा रेल्वे स्टेशन रस्त्याकडे वळविला. शुक्रवारीच या रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांना व्यवसाय झाल्यानंतर हातगाड्या सोबत नेण्याची सूचना देण्यात आली होती. अन्यथा शनिवारी हातगाड्या जप्त केल्या जातील, असा इशारा देण्यात आला होता. मनपाच्या पथकाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील विक्रेत्यांच्या तीन हातागाड्या व टपऱ्या, २ लोखंडी बाक जप्त केले. त्यानंतर हे पथक महापालिकेत परतले. दरम्यान, हातगाड्या जप्त झाल्याची माहिती मिळताच विक्रेतेदेखील मनपात आले. त्यांनी साहित्य परत देण्याची मागणी केल्यावरून विक्रेते व मनपा पथकातील कर्मचारी यांच्यात वाद होऊन प्रकरण बाचाबाचीपर्यंत गेले. अतिक्रमण निर्मूलनच्या अधीक्षकांनी मध्यस्थी करीत वाद मिटविला.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *