facebook
Sunday , March 26 2017
Breaking News
Home / Featured / विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुटका

विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुटका

आवाज न्यूज नेटवर्क –

नाशिक – गुरुवारी रात्री कुत्र्याची शिकार करताना विहिरीत पडालेला मादी जातीचा बिबट्याला वनविभागाने सुखरूप बाहेर काढले. शिंगवे येथील साहेबराव डेर्ले यांच्या शेतातील विहिरीत ही मादी पडली होती.

एक ते दीड वर्षाची ही मादी येवला वनविभाग आणि स्थानिक नागरिकांच्या प्रयत्नाने विहिरीतून जिंवतपणे बाहेर काढण्यात आली. शिंगवे येथे साहेबराव रंगनाथ खंडेराव डेर्ले हे शेतात वस्ती करून राहतात. गुरुवारी सायंकाळी डेर्ले कुटुंबीय हे जेवण करीत असताना अचानक मोठा आवाज झाला. डेर्ले कुटुंबाने विहिरीकडे धाव घेतली तेव्हा बिबट्या विहिरीत पडल्याचे लक्षात आले. येवला वन विभागाला कळविल्यानंतर बी. आर. ढाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंजरा टाकून बिबट्याला बाहेर काढण्यात आले. बिबट्या विहिरीत विद्युत पंपाच्या पाइपला आणि वायररोपाच्या आधाराने पाण्यात थांबून होता. बिबट्या जिथे आधाराला पकडून होता त‌िथपर्यंत दोरखंडाच्या सहाय्याने पिंजरा सोडण्यात आला. रात्री अकरा वाजता त्याल बाहेर काढण्यात आले. निफाड तालुक्यात बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी वन विभागाने १५ पिंजरे लावलेले आहेत. परंतु गेल्या काही महिन्यांपासून बिबटे पिंजऱ्यात जेरबंद होण्याचे प्रमाण खूपच कमी झाले होते.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *