facebook
Thursday , May 25 2017
Breaking News
Home / Featured / ​पुढील वर्षात दीड लाख कामे

​पुढील वर्षात दीड लाख कामे

आवाज न्यूज नेटवर्क –

अहमदनगर – रोजगार हमी योजनेतून पुढील आर्थिक वर्षातील कामांचे नियोजन जिल्हा परिषदेने केले आहे. या वर्षात नवीन १ लाख ५९ हजार कामे केली जाणार आहेत. या आराखड्यास गुरुवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. दरम्यान, नवीन कामे हाती घेतली जाणार असली तरी अपूर्ण कामांची संख्याही वाढली आहे. जिल्ह्यात तब्बल आठ हजार कामे अपूर्ण असून ही कामे पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांच्या बैठका सुरू आहेत. जलसंधारण, वनीकरणाची व रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणावर अपूर्ण राहिली आहेत.
राज्य सरकारने रोजगार हमीसाठी नवीन अकरा कलमी कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये शेततळे, सिंचन विहिरी, व्हर्मी व नाडेप कंपोस्टींग, फळबाग लागवड, शौचालय बांधकाम, शोषखड्डे, जलसंधारणाची कामे, रोपवाटिका, वृक्षलागवड संवर्धन तसेच गावाच्या विकासासाठी अंगणवाडी बांधकाम, क्रीडागणांचा विकास, स्मशानभुमी सुशोभिकरण, ग्रामपंचायत भवन, घरकुले, गावातील रस्ते तयार करणे यासारखी कामे केली जाणार आहेत. या कार्यक्रमानुसाच यावेळी कामांचे नियोजन करण्यात आले आहे. वैयक्तिक लाभाची जवळपास एक लाख नवीन कामे निश्चित केली आहेत. या कामांतून गावातील कुटुंबांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचे नियोजन आहे. यामध्ये वैयक्तिक शौचालय, रोपवाटिका, फळबाग लागवड, घरांचे बांधकाम या कामांचा समावेश आहे. ही सर्व कामे एप्रिल २०१७ पासून सुरू केली जाणार असून या कामांवर साधारण दोनशे कोटी रुपये खर्च केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. नवीन कामांत जलसंधारण २५ हजार ४४३, रस्ते २ हजार १८८, फळबाग वनीकरण १९ हजार ४७५, पाटबंधारे ३७९, घरकुले १० हजार ८०६ वैयक्तिक लाभाची १ लाख १ हजार कामे केली जाणार आहेत.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *