facebook
Thursday , May 25 2017
Breaking News
Home / जळगाव / अवघ्या एक रुपयात लग्न

अवघ्या एक रुपयात लग्न

महागाईच्या दिवसांत लग्नसोहळ्यांवर लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा सामुदायिक विवाह सोहळे अधिक योग्य आहेत. अशा सोहळ्यांच्या माध्यमातून कोणी विवाह करण्यास इच्छुक असल्यास त्यांच्याकडून केवळ एक रुपया घेऊन त्यांचा विवाहसोहळा पार पाडण्यात येईल, असा मानस वाणी समाजाचे अध्यक्ष अनिल वाणी यांनी व्यक्त केला.

सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात रविवारी वाणी समाजाच्या राज्यस्तरीय युवकयुवती परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख अतिथी आमदार सुरेश भोळे हे होते. संस्थेचे अध्यक्ष अनिल वाणी, सतीश वाणी, वसंतराव बाविस्कर, विवेक वाणी हे उपस्थित होते. अनिल वाणी म्हणाले की, येत्या २०१७ मध्ये सामुदायिक विवाह सोहळा घडवून आणण्याचा मानस आहे. त्यासाठी येत्या १५ दिवसांत नियोजन करण्यात येणार आहे.

Check Also

एकच पर्व, बहुजन सर्व!

‘एकच पर्व बहुजन सर्व’ चा नारा देत बहुजन समाजाच्या विविध मागण्यांसाठी हजारोंच्या संख्येने बहुजन बांधवांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *