facebook
Wednesday , March 29 2017
Breaking News
Home / नागपूर / खटल्यातील युक्तिवाद अंतिम टप्प्यात

खटल्यातील युक्तिवाद अंतिम टप्प्यात

कथित माओवादीसमर्थक असल्याचा आरोप असलेले दिल्ली विद्यापीठातील प्रा. जी. एन. साईबाबा यांच्यावरील खटल्यातील साक्षीदारांचे बयान नोंदविण्यात आले आहेत. आता या खटल्यात युक्तिवाद सुरू असून २१ डिसेंबर रोजी सरकारीपक्षाचा युक्तिवाद संपण्याची अपेक्षा आहे. रोज सुनावणी घेऊन हा खटला लवकरात लवकर निकाली लावण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते. या आदेशांनंतर या खटल्याला वेग प्राप्त होऊन सुनावणी अंतिम टप्प्यात आल्याची माहिती बचावपक्षाच्या वकिलांनी दिली.

कथित माओवादी हेम मिश्रा याला गडचिरोली पोलिसांनी अटक केली होती. दलम कमांडर नर्मदाक्का हिच्याकडे तो संदेश घेऊन जात होता आणि हा संदेश प्रा. साईबाबांनीच पाठविला होता, असा आरोप पोलिसांनी हेम आणि साईबाबा यांच्यावर लावला आहे. गडचिरोली पोलिसांनी दिल्ली येथून साईबाबा यांना अटक केली होती. साईबाबा यांचा जामीनअर्ज मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळून लावल्यानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. या सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने हा खटला दररोज चालविण्याचे आदेश दिले होते.

‘या प्रकरणी सरकारी पक्षाचा युक्तिवाद सुरू झाला आहे. साईबाबा वगळता सर्वच आरोपींविरुद्ध सरकारीपक्षाचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. २१ डिसेंबर रोजी या प्रकरणाची पुढील तारीख आहे. यावेळी मुख्य आरोपी प्रा. साईबाबा यांच्याविरुद्ध युक्तिवाद करण्यात येणार आहे. या दिवशी सरकारी पक्षाचा युक्तिवाद संपेल,’ अशी शक्यता या खटल्यात सरकारी पक्षाची बाजू मांडत असलेले विशेष सरकारी वकील पी. के. सत्यनाथन यांनी व्यक्त केली. अॅड. सुरेंद्र गडलींग आणि अॅड. जगदीश मेश्राम हे या खटल्यात आरोपींतर्फे यु​िक्तवाद करीत आहेत.

Check Also

अबब! कोल्ड्रींकवर ६६ टक्के अधिक शुल्क

रेफ्रीजरेटरमध्ये ठेवण्यात येणाऱ्या बहुतांश डबाबंद पदार्थांवर अतिरिक्त शुल्क घेण्याचा अनधिकृत पायंडा अनेकांनी घातला आहे. पण, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *