facebook
Thursday , April 27 2017
Breaking News
Home / जळगाव / देशाच्या प्रगतीसाठी प्रार्थना

देशाच्या प्रगतीसाठी प्रार्थना

पैगंबर मुहम्मद यांच्या जयंतीनिमित्त बोहरा समाजातर्फे रविवारी शोभायात्रा काढण्यात आली होती. शोभायात्रेच्या समारोपप्रसंगी बोहरा समाजबांधवांनी देशाच्या प्रगतीसाठी प्रार्थना केली.

सुभाष चौकातील बोहरा मशिदीपासून सकाळी शोभायात्रेला सुरुवात झाली. चौबे शाळा, घाणेकर चौक, टॉवर चौक, चित्रा चौक, बेंडाळे चौकमार्गे बोहरा मशिदीत शोभायात्रेचा समारोप करण्यात आला. शोभायात्रेमध्ये बग्गी, घोडे होते. जमाली बँड पथकही सहभागी झाले होते. समाजाचे अध्यक्ष शेख मोहम्मद उज्जैनवाला यांचे मोहिज आरसीवाला, युसूफ मकरा, मोहिज लेहरी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. शेख मोहम्मद यांनी सर्वांना रोज नमाज आणि कुराण पठण करण्याबाबत मार्गदर्शन केले. बोहरा धर्मगुरू सैय्यदना मुफ्फदल सैफुदीन साहेब (त.उ.स.) यांचा संदेश देत प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला कुराण तोंडी पाठ असावे, असे सांगितले.

Check Also

एकच पर्व, बहुजन सर्व!

‘एकच पर्व बहुजन सर्व’ चा नारा देत बहुजन समाजाच्या विविध मागण्यांसाठी हजारोंच्या संख्येने बहुजन बांधवांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *