facebook
Sunday , May 28 2017
Breaking News
Home / नाशिक / नाशिक-पुणे मार्गावर वाहतूक तीन तास ठप्प

नाशिक-पुणे मार्गावर वाहतूक तीन तास ठप्प

राख वाहून नेणाऱ्या ट्रकचा पाटा चेहेडी येथील दारणा नदीच्या पुलावर तुटल्याने नाशिक-पुणे महामार्गावरील वाहतूक रविवारी दुपारी तीन तास ठप्प झाली. यामुळे प्रवाशी आणि वाहनचालकांचे हाल झाले.

रविवारी दुपारी नाशिकरोडहून सिन्नरकडे राख वाहून नेणाऱ्या ट्रकचा दारणा नदीच्या पुलावर पाटा तुटल्याने तो जागेवरच थांबला. चालकाला ट्रक पुढे नेणे अवघड झाले. पुलावरच ट्रक अडकल्याने नाशिक-पुणे महामार्गावरील दुतर्फा वाहतूक ठप्प झाली होती. चेहेडी पूल ते सिन्नर फाटा, शिंदे, पळसेपर्यंत वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. नाशिकरोड पोलिस, वाहतूक शाखेचे कर्मचारी व बीट मार्शल यांनी घटनास्थळी जाऊन वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. तब्बल तीन तास या मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे खासगी वाहनांतील तसेच एसटी बसच्या प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला. ट्रकच्या दुरुस्तीचे काम झाल्यानंतर तब्बल तीन तासांनंतर वाहतूक सुरळीत झाली. दारणावरील हा पूल जुना झाला असून, त्याचे आयुष्य संपले आहे. त्यामुळे शेजारीच नवा पुल उभारला जात आहे. तथाप‌ि, त्याचे काम संथगतीने सुरू असल्याने वाहतुकीची कोंडी नेहमीचीच झाली आहे.

Check Also

मार्केट फुलले; चेहरे उतरले

रविवारच्या साप्ताहिक सुटीनंतर सोमवारी येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे येवला मुख्य बाजार आवार लाल कांदा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *