facebook
Friday , May 26 2017
Breaking News
Home / जळगाव / पोलिसांवर कारवाईसाठी आदिवासींचा ठिय्या

पोलिसांवर कारवाईसाठी आदिवासींचा ठिय्या

तालुक्यातील कुसुंबा बु।। येथे शनिवारी रात्री मद्यधुंद अवस्थेतील पोलिसांकडून एका तरुणास मारहाण झाल्याची घटना घडली होती. यातील दोषींवर कारवाई होण्यासाठी आदिवासी बांधवांनी रविवारी दिवसभर ठिय्या आंदोलन केले. सायंकाळी कारवाईचे लेखी आश्वासन मिळाल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले.

पोलिस निरीक्षकांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रावेर पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक ज्ञानेश्वर फडतरे व कर्मचारी यांनी कुसुंबा बु।। गावात काही एक कारण नसताना दारुच्या नशेत युसूफ मुसा तडवी या तरुणाच्या घरात घुसून त्याला पोलिस गाडीत डांबून रावेर पोलिस ठाण्यात आणले. काही एक कारण नसताना त्याला मारहाण करण्यात आली. पोलिसांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून आदिवासी तरुणावर जाणीवपूर्वक अन्याय आहे. संबंधितांवर अनुसूचित जातीजमाती कायद्यानुसार प्रतिबंधक कारवाई करण्यात यावी. सायंकाळी उशिरा कारवाईचे आश्वासन त्यांना मिळाले. दरम्यान, आंदोलनकर्त्यांशी बोलताना पोलिस निरीक्षक कैलास काळे म्हणाले की, अधिका-यांवर खोटे आरोप केले जातात. जळगाव येथेही उपविभागीय अधिकारी अशोक थोरात हे कर्तव्य बजावत असताना पत्रकारांनी त्यांचा उल्लेख मद्यधुंद अधिकारी, असा केला होता.

Check Also

एकच पर्व, बहुजन सर्व!

‘एकच पर्व बहुजन सर्व’ चा नारा देत बहुजन समाजाच्या विविध मागण्यांसाठी हजारोंच्या संख्येने बहुजन बांधवांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *