facebook
Monday , February 20 2017
Breaking News
Home / जळगाव / मद्यपी नगरसेवकांना रायगडावर चोप

मद्यपी नगरसेवकांना रायगडावर चोप

छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी असलेल्या रायगडावर मद्यप्राशन करणारे जळगाव महापालिकेतील काही मद्यपी नगरसेवक व एका नगरसेविकेच्या मुलास तेथील नागरिकांनी चोप दिल्याची घटना सोशल मीडियावर या घटनेचे फोटो व्हायरल झाल्याने उघडकीस आली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका फोटोमुळे जळगावात संबंधितांविषयी चर्चेने जोर पकडला आहे. या फोटोत एक नगरसेवक व नगरसेविकेचा मुलगा दिसत असल्याचा चर्चेत सांगितले जात आहे. या चर्चेतील माहितीनुसार जळगाव महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नगरसेवक, एक नगरसेविका पुत्र आणि काहींचे पती व त्यांची मित्रमंडळी काही दिवसांपूर्वी कोकण व रायगडच्या ट्रीपला गेले होते. या नगरसेवकांपैकी काही जणांनी रायगडावर मद्यप्राशन केल्याचे सांगितले जात आहे. सोशल मीडियावरील एका फोटोत नगरसेविकाचा मुलगा आणि एक नगरसेवक हातात पाण्याच्या बाटल्या, ग्लास घेऊन उभे असल्याचे दिसत आहे. जळगावच्या या मद्यपी नगरसेवकांना स्थानिक नागरिकांनी चोप दिला. हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Check Also

एकच पर्व, बहुजन सर्व!

‘एकच पर्व बहुजन सर्व’ चा नारा देत बहुजन समाजाच्या विविध मागण्यांसाठी हजारोंच्या संख्येने बहुजन बांधवांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *